Can Homemade Food Help in Weight Loss google
लाईफस्टाईल

Weight Loss Tips: पोटाच्या टायर्सनं हैराण झालात? घरचं जेवण करा अन् वजन घटवा; तज्ज्ञ सांगतात...

Homemade Food: घरचे जेवण, योग्य झोप आणि नियमित व्यायाम यामुळे वजन आणि फॅट नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकते. तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला जाणून घ्या आणि हेल्दी लाइफस्टाइल जगा.

Sakshi Sunil Jadhav

घरचे जेवण तरुणांना जास्त आवडत नाही. त्यांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खायला प्रंचड आवडतात. गरमा गरम वडा पाव, पिझ्झा, बर्गर, सॅंडविच, फ्रॅंकी अशा पदार्थांचा त्यामध्ये समावेश होतो. मग त्यांना लठ्ठपणाच्या समस्या जाणवतात. मग लोक खरचे जेवण खाण्याचा पर्याय निवडतात. हा पर्याय वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो का? याबद्दल आपण जाणून घेऊया.

सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर त्यांच्या सोशल मीडियापेजवर हेल्दी जीवनशैली कशी असते? याबद्दल माहिती आणि उपाय सांगत असतात. आज आपण घरचे जेवण नियमित खाल्याने वजन कमी होते का? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यातील सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे, वजन कमी करण्यासाठी पौष्टीक आणि योग्य आहार घेणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी खूप काही करण्याची, महागडे पदार्थ खाण्याची गरज नाही.

तुम्ही घरी बनवलेले जेवण खाल्ल्यानेही वजन कमी होऊ शकेल. चपाती, भात, डाळ, भाज्या, फळे आणि हंगामी पदार्थांचा समावेश असलेले पदार्थ खाऊ शकता. त्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि नॅचरली फॅटही कमी होतो. यासोबतच वेळेवर जेवण करणे, योग्य वेळी झोप घेणे आणि न चुकता व्यायाम करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर घरचे जेवण नियमित घेतले आणि त्यासोबत योग्य व्यायाम केला तर फक्त तीन महिन्यांतच शरीरावर मोठा फरक जाणवतो. वजन कमी होण्यासोबतच शरीर हलकं वाटतं आणि आरोग्यात सुधारणा सुद्धा होते. आणखी काही महिन्यांनी शरीराच्या आकारातही बदल दिसतो. विशेष म्हणजे, यासाठी महागडे डायट प्लॅन किंवा वेगळे काही पदार्थ सेवन करण्याची गरज नसते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT