Hair Colour Saam TV
लाईफस्टाईल

Hair Colour : दर आठवड्याला केसांना डाय लावणं बंद करा; काळ्या केसांसाठी 'हा' रामबाण नुस्खा वापरा

Homemade Diet For Hair Colour: कमी वयात केस पांढरे झाल्याने तरुणांना चार माणसांत मोकळ्या मनाने वावरता येत नाही. त्यांच्या मनात सतत भीती आणि लाज वाटत राहते.

Ruchika Jadhav

आजकाल अनेक व्यक्ती केस काळे व्हावेत यासाठी केसांना डाय लावतात. डाय शिवाय केस काळे कसे करायचे हे अनेकांना माहिती नाही. कमी वयात केस पांढरे झाल्याने तरुणांना चार माणसांत मोकळ्या मनाने वावरता येत नाही. त्यांच्या मनात सतत भीती आणि लाज वाटत राहते.

त्यामुळे प्रत्येक आठवड्याला ते केस काळे करतात. आता डाय वापरून काळे केलेले केस २ ते ३ वेळा धुतल्यानंतर लगेच सफेद होतात. त्यामुळे लगेच दुसऱ्या आठवड्यात देखील व्यक्ती डाय वापरतात. डायचा जास्त वापर केल्याने स्कॅल्पवर त्याचा वाइट परिणाम होतो. त्यामुळे हर्बल डाय घरीच बनवण्याची पद्धत जाणून घ्या.

घरगुती डाय बनवण्यासाठी साहित्य

सदाफुलीची फुलं - १० ते २०

कडीपत्त्याची पाने - १० ते २०

जास्वंदाची फुलं - ४ ते ५

तांदूळ - १ वाटी

कॉफी पावडर - १ वाटी

आवळा पावडर - २ चमचे

कृती

सर्वात आधी मिक्सरचं भांड घ्या. त्यामध्ये सदाफुलीची फुलं टाकून घ्या.

आता यामध्ये कडीपत्ता, जास्वंदाची पाने, तांदूळ हे सर्व टाकून मिक्सरला बारीक करून घ्या.

त्यानंतर दुसरे एक भांडे गॅसवर ठेवा. भांडे थोडे गरम झाल्यावर त्यावर कॉफी पावडर आणि २ चमचे आवळा पावडर टाकून घ्या.

त्यानंतर यामध्ये मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण मिक्स करा. अगदी थोडंसं पाणी यामध्ये अॅड करा. सर्व मिश्रण छान शिजवून घ्या.

मिश्रण पूर्ण घट्ट काळं होईपर्यंत गॅस मंद आंचेवर असू द्या. गॅस जास्त करू नका. अन्यथा साहित्य जळू शकतं.

डाय प्रमाणे या बॅटरला थिकनेस आल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण सुकल्यावर केसांना अप्लाय करा.

केसांवर हे मिश्रण अप्लाय केल्यानंतर ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने संपूर्ण केस स्वच्छ धुवून घ्या.

केस फॅन किंवा उन्हामध्ये छान वाळवून घ्या. केस ओले असताना ते वरती बांधून ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT