Dry Cough Home Remedies Yandex
लाईफस्टाईल

Dry Cough: थंडीमध्ये कोरडा खोकला तुम्हाला हैराण करतोय? 'या' घरगुती उपायांनी मिळेल लगेच आराम...

Dry Cough Home Remedies: थंडीमध्ये आपल्या त्वचेबरोबर आपल्या शरीरावर सुद्धा अनेक परिणाम होत असतात.

Saam Tv

थंडीमध्ये आपल्या त्वचेबरोबर आपल्या शरीरावर सुद्धा अनेक परिणाम होत असतात. त्यात थंडी, ताप, खोकला, हातापायात गोळे येणे या समस्यांचे प्रमाण थंडीत जास्त वाढते. त्यात खोकला हा एकदा झाला की, सहज जात नाही. त्यासाठी तुम्ही कप सिरपचे सेवन केले तरी कमी होत नाही. अशा वेळेस तुम्ही साधी सोपी घरगुती पद्धत वापरली पाहीजे. फारपुर्वीपासून लोक या समस्यांना घरगुती उपाय करतात आणि त्याचाच आराम औषधांपेक्षा जास्त लवकर येतो. चला तर जाणून घेऊ.

आयुर्वेदात जेष्ठीमध, आले हे दोन पदार्थ खोकल्यावर उपचारादरम्यान वापरतात. यामध्ये खूप जास्त प्रमाणात अॅंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्याने तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. आयुर्वेदात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. मधात विनाशकारी गुणधर्म असतात जे आपल्या घशाला आराम देतात. दुसरीकडे, खोकला बरा करण्यास जेष्ठीमध देखील खूप फायदेशीर आहे.

कोरडा खोकला घालवण्यासाठी घरगुती उपाय

मधाचा वापर

कोरड्या खोकला लवकर कमी करण्यासाठी रोज एक चमचा मधात आल्याचा रस मिसळून सेवन करा. मग काही वेळासाठी जेष्ठीमधाची काडी ठेवा. यामुळे तुमचा घसा कोरडा होणार नाही.

चाटण तयार करा

पिंपळाची गाठ उगाळून त्यात एक चमचा मध आणि पाणी मिसळून चाटण तयार करा. हे सेवन साधारण आठवडाभर केल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे जाणवतील.

आल्याचे चाटण तयार करा

आलं बारीक किसून त्यात चिमुटभर मीठ मिसळा. मग त्याचा गोळा तयार करून तोंडात ठेवा. सुरुवातीला थोडे तिखट वाटेल पण त्यात रस घशात गेला तर लगेचच खोकला कमी होईल.

लवंग मध

भाजलेली लवंग घ्या त्याची पुड तयार करा आणि त्यात मध मिक्सकरून चाटण तयार करा. शक्यतो हे चाटण तुम्ही झोपण्याआधी सेवन करा. त्यानंतर काही खाणे टाळा. शिवाय तेलकट पदार्थांकडे पाहणे सुद्धा टाळा.

हळदीचे दुध

खोकला असेल कफ असेल तर लहान मुलांना सुद्धा तुम्ही गरम दूध आणि हळद देऊ शकता. त्यात तुम्ही साखरे ऐवजी गुळाचा वापर सुद्धा करू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT