Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : केस गळतायत? हे घरगुती उपाय करा; नक्कीच फरक पडेल

Home Remedies for Dry Hair : केस गळतीसाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Natural Products For Silky Hair :

आजकाल सर्वांचेच जीवन खूप व्यस्त झाले आहे. त्यामुळे स्वतः च्या शरीराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये. शरीरासोबतच आपण आपल्या केसांची निगा राखत नाही. त्यामुळे केस खूप गळतात, कोरडे होतात, केसांची वाढ खुंटते अशा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते.

सध्या अनेक महिलांमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यासाठी अनेक केमिकल युक्त शॅम्पूचा वापर करतात. त्यामुळे केसांचे खूप नुकसान होते. त्यामुळे नेहमी नैसर्गिक आणि घरगुती उपाय ट्राय करा. आज आम्ही तुम्हाला केसांसाठी असेच काही घरगुती उपाय सांगणर आहोत. जेणेकरुन तुमचे केस मऊ, मजबूत होतील.

1. खोबरेल तेल

खोबरेल तेल हा केसांसाठी सर्वात चांगला उपाय आहे. खोबरेल तेल हे नैसर्गिक आणि केसांसाठी चांगले आहे. केस धुण्याआधी खोबरेल तेल लावा. त्यामुळे केस मजबूत होतील. केस तुटणे किंवा गळणे कमी होईल.

2. अंडी

अंडी हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. कंडिशनर लावल्यानंतर जसे केस मऊ होतात. तसेच केस अंडी लावल्यानंतर होतात. केस धुण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. तुमचे केस मऊ होतील.

3. दही

दही हे केसांसाठी खूप फायद्याचे असते. केस धुण्याआधी १ तास दही लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. दही लावल्याने केसातील कोंडा दूर होतो.

4. केळी आणि मध

केळी आणि मध हे केसांसाठी खूप फायदेशीर असते. केस धुण्यापूर्वी केळी आणि मध एकत्र डोक्याला लावा. यासाठी दोन पिकलेली केळींमध्ये त्यात मध मिसळा. हे केसांना लावा. त्यानंतर १ तासानंतर केस धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Nora Fatehi-Shreya Ghoshal : मेलोडी क्वीन श्रेया घोषाल अन् दिलबर गर्ल नोरा फतेही एकत्र, क्रॉस-कल्चरल व्होकल कोलॅबोरेशनची चर्चा

Child Health Tips: सकाळच्या वेळेस 'या' गोष्टी लहान मुलांना खाऊ घालणे धोकादायक

TATA Harrier EV: टाटा हॅरियर ईव्ही लाँच! टेस्ला आणि बीवायडीला टक्कर देण्यासारखे आहेत खास फीचर्स, किंमत

Shravan Banana Leaf: श्रावणात केळीच्या पानात का जेवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT