Holi 2024, Acidity Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 : होळीच्या दिवशी जास्त खाल्ल्याने होऊ शकतो अपचनाचा त्रास, कशी घ्याल काळजी?

Acidity Problem : तेलाचे आणि गोडाचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट दुखी, छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या होतात. यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Home Remedies For Bloating Problem :

सणांच्या वेळी आपण अधिक चांगले, चमचमीत आणि गोडाचे पदार्थ खातो. या काळात जास्त प्रमाणात अन्न खाल्ले जाते. गुजिया, मिठाई, शंकरपाळी, जिलेबी, पापडा, थंडाई अशा अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अतिप्रमाणात पदार्थांचे सेवन करतो.

भरपूर खाल्ल्याने पोट फुगणे, गॅस आणि अॅसिडिटीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तेलाचे आणि गोडाचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट दुखी, छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या होतात. यासाठी आरोग्याची (Health) काळजी (Care) कशी घ्यायला हवी जाणून घेऊया.

1. आहाराकडे लक्ष द्या

गोडाचे पदार्थ कमी खाण्याचा प्रयत्न करा. मिठाई खाल्ल्याने पोट भरलेले राहाते. आहारात पोषक द्रव्ये मिळतील अशा गोष्टींकडे अधिक लक्ष द्या.

2. पुरेसे पाणी प्या

अतिप्रमाणात खाण्याऐवजी स्वत:ला हायड्रेट ठेवा. यासाठी पुरेसे प्रमाणात पाणी प्या. गोड, तिखट किंवा तळलेले पदार्थ खात असाल तर त्याआधी पाणी (Water) प्या.

3. अन्न पदार्थ चावून खा

जे लोक अन्न हळूहळू आणि नीट चावून खातात. ते सामान्य लोकांपेक्षा ७० टक्के कमी कॅलरीचे सेवन करतात. आपल्या लाळेमध्ये अनेक एंजाइम असते जे अन्नासह कार्बोहायड्रेट्सचे पचन करण्यास सुरुवात करतात. अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते.

4. फायबरयुक्त पदार्थ खा

आहारात अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. फायबरचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहाते. ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही. आहारात बीन्स, हिरव्या भाज्या, ओट्स आणि फळांचा समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chalisgaon Tourism : धुकं, हिरवळ अन् फेसाळलेला धबधबा! पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात चाळीसगावजवळची 'ही' 5 ठिकाणं

Wednesday Horoscope : पाण्यासारखा पैसा खर्च होईल; ५ राशींच्या व्यक्ती ठरणार लकी, वाचा आजचे राशीभविष्य

Padma Awards: रोहित शर्मा, आर. माधवन यांच्यासह महाराष्ट्रातील 7 मान्यवरांना 'पद्म' पुरस्कार प्रदान

गुटखा मिळत नसल्याने कॅब चालकाचं डोकं फिरलं! आयुक्त तुकाराम मुंढेंना शिवीगाळ, आक्षेपार्ह व्हिडिओ केला व्हायरल

कुछ बडा होने वाला है! भाजप ३ राज्यातील मुख्यमंत्र्यांना CM पदावरून हटवणार; माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT