Holika Dahan Saam Tv
लाईफस्टाईल

Holi 2024 Puja, Muhurt: होळी पूजनचा शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या तिथी आणि पूजा पद्धत

Holi 2024 Puja Time, Tithi, Puja Vidhi: यंदा हा सण २४ मार्चला साजरा केला जाणार आहे. होळी हा सण उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन यांसारख्या विविध नावाने ही ओळखले जाते.

कोमल दामुद्रे

Holi 2024:

होळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण. होळीला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन अशा विविध नावांनी ओळखले जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण मोठ्या थाटामात साजरा केला जातो.

यंदा हा सण २४ मार्चला साजरा केला जाणार आहे. होळी हा सण (Festival) उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा (Celebrate) केला जातो. या उत्सवाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन दोलायात्रा, कामदहन यांसारख्या विविध नावाने ही ओळखले जाते.

फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या सणाला फाल्गुनोत्सव असे म्हणतात. यानंतर वसंतोत्सवारंभ सुरु होतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार हा सण श्रीकृष्णाचा आवडची सण आहे. त्यामुळे मथुरा, वृंदावन, बनारस, गोकुळ या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

1. होळीची तारीख आणि वेळ (Date and Time)

यंदा होळीचा सण (Holi Festival) हा २४ मार्चला साजरा करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण हा २५ मार्चला साजरा केला जाईल. पंचागानुसार होळी पौर्णिमा ही २४ मार्चला सकाळी ९.५४ मिनिटांनी सुरु होईल तर दुसऱ्या दिवशी २५ मार्चला दुपारी १२.२९ वाजता समाप्त होईल.

2. होलिका दहन पूजनाचे साहित्य (Puja Samagri)

हळदी-कुंकू, अक्षता, फुले, हार, कापूस, नारळ, पाण्याने भरलेला कलश, नैवेद्यासाठी पुरणपोळी

3. होलिका पूजन पद्धत (Puja Process)

सर्वात आधी होलिका पूजन करताना पाण्याचा अर्घ्य देत होलिका मातेला प्रदक्षिणा घाला. नारळ अर्पण करुन नैवेद्य दाखवा. प्रदिक्षणा घातल्यामुळे तुमच्या मनातील वाईट विचार आणि नैराश्य दूर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT