Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ५ राशींसाठी येणारा आठवडा लकी! वाचा कसे असेल साप्ताहिक भविष्य

कोमल दामुद्रे

मेष

आर्थिक दृष्टीकोनातून फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ

विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा होईल. नवीन प्रयोग यशस्वी होतील, आरोग्याच्या समस्या उद्भवतील.

मिथुन

डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जोडीदारामुळे निराशा सहन करावी लागेल.

कर्क

बाहेरचे खाणे टाळा. मोठ्या योजनेवर काम कराल. अस्वस्थता जाणवेल.

सिंह

उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. सरकारी कामात विलंब होईल. तणाव आणि वाद होतील.

कन्या

कौटुंबिक जबाबदारीत अडकाल. आर्थिक पाया चांगला राहिल. कामात अडथळे येतील.

तुळ

कामाला गती मिळेल. कामे सहज पार पडतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. मन अस्वस्थ होईल. कामात निराशा येईल. घाईने कोणताही निर्णय घेऊ नका.

धनु

आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागू शकतो. वागण्याने कामाच्या ठिकाणी इतरांना दुखवाल. मोठ्या कामात यश मिळेल.

मकर

समाजात तुमचा प्रभाव वाढेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. कामात अडथळे येतील.

कुंभ

मुलांकडून सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल.

मीन

आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल. पैसे कमावण्याच्या नवीन संधी शोधाल.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.