कोलेस्ट्रॉल म्हटलं की अनेकांना ती नाकारात्मक गोष्ट वाटते. मात्र कोलेस्ट्रॉल नेहमीच वाईट नसतं. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यामध्ये एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि दुसरं हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL). HDL कोलेस्टेरॉल हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त असतं. त्याचप्रमाणे ते आणि हृदयरोगाचा धोका कमी करतं. परंतु LDL कोलेस्टेरॉल वाढल्यास ते धोकादायक ठरतं.
वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार करून त्या अरुंद करतं. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकार, स्ट्रोक, तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. उच्च कोलेस्ट्रॉल शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतं. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं की त्याची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं नेमकी काय असतात ते जाणून घेऊया.
“ज्यावेळी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये फॅटचा थर तयार होतो. ज्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. हळूहळू या थरामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. परिणामी रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयविकार, स्ट्रोक किंवा पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) सारख्या आजारांचा धोका वाढतो.”
डोळ्यांभोवती पिवळसर चरबीसारख्या गाठी तयार होणं किंवा डोळ्यांच्या कडा पांढरट-करड्या रंगाच्या दिसणं ही हाय कोलेस्ट्रॉलची चिन्हं असू शकतात. या गाठी स्वतःहून घातक नसतात, पण त्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढल्याचे संकेत असतात. संशोधनानुसार, हा त्रास सुमारे १.१% महिलांमध्ये आणि ०.३% पुरुषांमध्ये आढळते. हे प्रामुख्याने ३५ ते ५५ वयोगटात दिसून येतं.
पाय थंड पडणं, सुन्नपणा, चालताना कळ येणं किंवा जखमा बऱ्या न होणं ही लक्षणे पायातील रक्तपुरवठा कमी झाल्याची असू शकतात. कोलेस्ट्रॉलच्या थरामुळे पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद होतात, त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. या स्थितीला Peripheral Artery Disease म्हटलं जातं.
हात व बोटांमध्ये सुन्नपणा, कळा किंवा थंडपणा जाणवणं हेही रक्तवाहिन्या अरुंद झाल्याचे लक्षण असू शकते.
छातीत दुखणं किंवा दडपण जाणवणं हे कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद झाल्याचे संकेत असू शकतात. हे हृदयविकार किंवा हार्ट अटॅकचं प्रमुख लक्षण मानलं जातं.
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे त्वचेखाली चरबीच्या गाठी दिसू शकतात. या गाठी कोपर, गुडघे किंवा हिप्सवर तयार होतात. या गाठींचे कारण म्हणजे शरीरात कोलेस्ट्रॉलचं अत्यंत जास्त प्रमाण असू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.