High Blood Pressure google
लाईफस्टाईल

Blood Pressure: सततच्या टेन्शनमुळे वाढतो BP! तुमची ही सवय लगेच बदला, डॉक्टरांनी दिलाय सल्ला

Stress and Hypertension: सततचा ताण, चुकीची जीवनशैली आणि मेंदूतील लपलेल्या भागामुळे हाय ब्लड प्रेशर वाढू शकतो. नव्या संशोधनातून श्वासोच्छ्वास आणि रक्तदाब यांचा थेट संबंध समोर आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लाइफस्टाइलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकांच्या गरजा आता वाढल्यात, स्वप्न महागडी झालेत. त्यामुळे लोक दिवसरात्र मेहनत करून त्यांच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करत असतात. यासगळ्या कामाच्या गडबडीत प्रत्येकालाच टेन्शन येतं. त्यामध्ये महागाईसुद्धा झपाट्याने वाढताना दिसतेय. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढतो, त्यातच महागाई वाढत असते, प्रवासाची दगदग असते. अशावेळेस घरात वाद होतात, टेन्शन येतं आणि तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसायला लागतो. मात्र तो तुम्ही दुर्लक्षित करुन पुन्हा तुमच्या कामाला लागता.

डॉक्टरांच्या मते, काही आजार हे दुर्लक्षित केल्यामुळेच वाढले आहेत. त्यातला गंभीर आजार म्हणजे, हाय ब्लड प्रेशर हा आहे. कारण ब्लड प्रेशर वाढण्याची कारणे ही सामान्य वाटणारी असतात. जसं की, ताणतणाव, अन् हेल्दी आहार, कमी झोप, व्यायाम टाळणे, सतत एखाद्या गोष्टीवरुन चिडचिड करणे. त्यामुळे तुम्ही किमान वयाची तिशी ओलांडल्यावर काही तपासण्या करुन घेणं महत्वाचं असतं.

आता वैज्ञानिकांनी केलेल्या नव्या संशोधनातून हाय ब्लड प्रेशरचे मूळ मेंदूतल्या एका लहान आणि लपलेल्या भागात असू शकतं, असा दावा केला आहे. University of Auckland येथे करण्यात आलेल्या आणि Circulation Research मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात मेंदूतल्या लॅटरल पॅराफेशियल रीजन या भागाचा अभ्यास करण्यात आला. हा भाग जोरात श्वास सोडण्याच्या प्रक्रियेशी संबंधित मानला जातो.

जसं की, तुम्हाला हसताना किंवा खोकताना जास्त श्वास घ्यावा लागतो. पण आता संशोधकांचे म्हणणं आहे की, हा भाग रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यासही कारणीभूत ठरु शकतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हा मेंदूचा भाग अॅक्टीव्ह झाला की तो श्वासावर परिणाम करत नाही, तर संपूर्ण शरीरातील रक्तदाब वाढवणारे सिग्नलही पाठवतो.

त्यामुळे डॉक्टरांनी BPच्या रुग्णांना काळजी घेण्यासाठी मीठाचे सेवन टाळणे, जमेल तितका ताण कमी करणे, ताण कमी करण्यासाठी योगा करणे, वजन नियंत्रणात ठेवणे हा सल्ला दिला आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रातील खासदारांना ५० कोटींना विकत घेतलं जात आहे, महत्त्वाच्या व्यक्तीने दिली माहिती - संजय राऊत

Luxury Bus Accident: भरधाव लक्झरी बस ट्रकला पाठीमागून धडकली, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Solapur Bhuikot Fort : सोलापूरच्या किल्ल्याला 'भुईकोट' नाव कसं पडलं? 'हे' आहे रंजक कारण

Gold Rate Today : आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, वाचा मुंंबई-पुण्याचे ताजे दर

Famous Actor : "माझ्या पत्नीने माझ्यासोबत एका बेडवर झोपायला नकार दिला..."; प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT