Blood Pressure google
लाईफस्टाईल

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

Diabetes and BP Management: जेवणाची वेळ बदलल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री लवकर जेवण आणि 11-13 तासांचा गॅप ठेवल्यास रक्तदाब, ब्लड शुगर आणि मेटाबॉलिक आरोग्य सुधारते.

Sakshi Sunil Jadhav

सध्या ऑफिसच्या वेळा या बऱ्याच ठिकाणी 'Flexible' आहेत. काहींना दिवसा किंवा रात्री दोन्ही वेळेस कामाला जावं लागतं. त्यामुळे दिवसभरातलं तुमच्या खाण्या-पिण्याचं वेळापत्रक बदलू शकतं. आपण आपल्या सोयीनुसार जेवतो. म्हणजेच कसल्याच वेळा पाळत नाही. त्याने शरीरावर मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. विशेषत: यामध्ये ब्लड प्रेशरच्या रुग्णांना त्रास होतो.

WHOच्या रिपोर्टनुसार जगभरातलो लाखो लोक हे हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त आहे. त्यात डायबेटीजच्या रुग्णांची संख्या ८३ टक्के इतकी आहे. यासगळ्यामध्ये फक्त खाण्याची वेळ नाही तर, अयोग्य आहार, चुकीच्या वेळेला झोपणं, एका जागी बसून राहिल्यामुळे होणारा लठ्ठपणा, व्यायाम टाळणं अशा समस्याही याला कारणीभूत ठरत आहेत.

हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटीच्या रुग्णांनी योग्य औषधं घेऊन त्यावर नियंत्रण मिळवणं आत्ता सोपं झालंय. पण फक्त गोळ्या- औषधांनी त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यासाठी तुमच्या जेवणाची वेळ खूप कारणीभूत ठरते. असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे या रुग्णांनी जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळेत बदल केला पाहिजे. मगच औषधं घेतली पाहिजेत. कारण यासगळ्यामध्ये तुमची पचनक्रिया आणि वेळ खूप महत्वाची असते.

तज्ज्ञांच्या मते, ३६ ते ७५ वयोगटातल्यांमध्ये लठ्ठपणा किंवा मेटाबॉलिक समस्यांचा धोका वाढलेला आहे. असं संशोधनात समोर आलं. त्यामध्ये जेव्हा तुम्ही रात्री लवकर जेवता आणि रात्री ११ ते १३ जेवणात गॅप ठेवता तेव्हा तुमच्या रक्तदाब कमी होतो. हा रक्तदाब साधारण ३.५ टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे झोपेच्या ३ तास आधी जेवा. तसेच ब्लड शुगर नियंत्रण आणि इन्सुलिन कार्यक्षमता सुधारल्याचंही संशोधनात समोर आलं आहे. तुम्ही तुमच्या जेवणात आणि नाश्त्याच्या वेळेत थोडे फार बदल करुन नक्कीच चांगले परिणाम मिळवू शकता.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच आंदोलन

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

ITR Update : वेळेत आयटीआर भरला तरीही रिफंड अडकू शकतो; एका चुकीमुळे भरावा लागेल दंड

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

SCROLL FOR NEXT