High Blood Pressure Heart Damage saam tv
लाईफस्टाईल

Hypertension Effect on Heart : उच्च रक्तदाबाचा हृदयावर तुमच्या हृदयावर कसा होता घातक परिणाम, तज्ज्ञांनी सांगितले उपाय

High Blood Pressure Heart Damage: अनियंत्रित उच्च रक्तदाब तुमच्या हृदयास नुकसान पोहोचवू शकतो आणि गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो. लक्षात ठेवा, नियमित रक्तदाब तपासणी, औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उच्च रक्तदाब हा हृदयरोगासाठी जोखीम घटकांपैकी एक आहे, जे जगभरातील मृत्यूचं पहिलं कारण ठरतंय. उच्च रक्तदाब हा हळूहळू हृदयासारख्या विविध अवयवांना नुकसान पोहोचवतो. उच्च रक्तदाब असलेल्या मोठ्या संख्येने लोकांना हृदयाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा तो तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण निर्माण करतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल्युअर यासारख्या घातक परिस्थितींचा सामना करावा लागतो.

उच्च रक्तदाब तुमच्या हृदयावर विपरीत परिणाम करू शकतो आणि भविष्यातील गुंतागुंत वाढवू शकतो. म्हणून, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि हृदयाच्या समस्यांना वेळीच दूर करणं आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाचा हृदयावर होणारा परिणाम

ग्लेनईगल्स हॉस्पिटल्समधील वरिष्ठ कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जन डॉ. स्वरूप स्वराज पाल यांनी सांगितलं की, ज्यावेळी रक्तदाब सतत वाढत असतो, तेव्हा तुमच्या हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. कालांतराने, यामुळे हृदयाचे स्नायू प्रसरण पावतात आणि त्यांची कार्यक्षमता मंदावते, ज्यामुळे हार्ट फेल्युअरची शक्यता वाढते. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांची झीज होते. या नुकसानामुळे प्लेक तयार होते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस सारखी समस्या उद्भवते.

डॉ. पाल पुढे म्हणाले की, जी एक अशी स्थिती आहे की त्यात रक्तवाहिन्या अरुंद आणि कडक होतात. ज्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह मंदावतो. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक आणि अरुंद होऊ शकतात आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयावरील हा अतिरिक्त दबाव त्याच्या ऱ्हदयाच्या लयीवर देखील परिणाम करू शकतो, ज्यामुळे भविष्यात स्ट्रोकची समस्या उद्भवते.

उच्च रक्तदाबापासून तुमच्या हृदयाचे संरक्षण करण्यासाठी महत्वाचे उपाय

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा. नियमितपणे औषधे घ्या आणि खारट, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन टाळा. सोडियमचे सेवन कमी केल्यास रक्तदाब कमी होण्यास मदत होते आणि हृदयावरील ताण देखील कमी होतो हे सिद्ध झाले आहे. शारीरिक हालचाली करणे टाळू नका. दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करा आणि तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकाल आणि हृदयाच्या समस्या टाळू शकाल.

योग आणि ध्यान करून ताण कमी करा, कारण या विश्रांती तंत्रांमुळे तुम्हाला शांत होण्यास आणि तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. धूम्रपान आणि मद्यपान सोडा, कारण हे दुष्परिणाम रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतात आणि हृदयावर परिणाम करून रक्तदाब वाढवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT