Harley Davidson X440 Saam Tv
लाईफस्टाईल

Harley-Davidson X440: पॉवरफुल इंजिन आणि जबरदस्त लूक! Hero ने केली 1000 हार्ले-डेव्हिडसन X440 ची विक्री

Satish Kengar

Harley-Davidson X440:

हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनीपैकी एक आहे. हिरोने १५ ऑक्‍टोबरपासून देशभरात हार्ले-डेव्हिडसन X440 च्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात केली. देशाच्‍या विविध भागांमधील १०० डिलरशिप्‍ससह हार्ले-डेव्हिडसन आणि निवडक हिरो मोटोकॉर्प आऊटलेट्समधून हार्ले-डेव्हिडसन X440 मोटरसायकल्‍सच्‍या मोठ्या प्रमाणात डिलिव्‍हरी करण्‍यात आल्‍या.

हार्ले-डेव्हिडसन X440 हिरो मोटोकॉर्प्सच्या गार्डन फॅक्टरी नावाने ओखळल्या जाणाऱ्या कारखान्यात उत्पादित केली जात आहे. उत्तर भारतातील राजस्थानामधील नीमराणा येथे हा कारखाना आहे. हार्ले-डेव्हिडसन X440 जुलै २०२३ मध्ये सर्वांसमोर आल्यापासून भारतभरातील अव्वल श्रेणीतील ग्राहकांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. म्हणूनच केवळ महिनाभरात २५००० बुकिंग्ज झाली आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निरंजन गुप्ता म्हणाले, ''आम्‍हाला ग्राहकांच्‍या चेहऱ्यांवरील आनंद पाहण्‍यासह त्‍यांच्‍याकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून आनंद झाला आहे. आम्‍ही सणासुदीच्‍या काळाच्‍या पहिल्‍याच दिवशी डिलिव्‍हरींना सुरूवात केली. पुढील ४ ते ५ महिन्‍यांमध्‍ये सर्व डिलिव्‍हरी पूर्ण करण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल. आमची पुरवठा साखळी क्षमता पूर्ण करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये आहे, तसेच आम्‍ही हार्ले-डेव्हिडसनचे मालक बनण्‍याची इच्छा असलेल्‍या भारतातील ग्राहकांना सेवा देण्‍यास आणि प्रतिक्षा काळ कमी करण्‍यास उत्सुक आहोत.'' (Latest Marathi News)

''आम्‍ही देशभरातील द्वितीय श्रेणीच्‍या व लहान शहरांमधील मोटरिंग उत्‍साहींना हार्ले-डेव्हिडसन मोटरसायकल्‍सच्‍या रोमांचपूर्ण राइडचा आनंद देण्‍यासाठी उत्‍सुक आहोत. मी हे उल्‍लेखनीय यश संपादित करण्‍यामध्‍ये अथक मेहनत घेतलेल्‍या संपूर्ण हिरो मोटोकॉर्प व हार्ले-डेव्हिडसन कुटुंबाचे कौतुक करतो.''

नवीन ग्राहक हार्ले-डेव्हिडसन X440 ची टेस्‍ट राइड घेऊ शकतात आणि देशभरातील हार्ले-डेव्हिडसनच्या सर्व डीलरशिप्सवर किंवा निवडक हिरो मोटोकॉर्प आउटलेट्समध्ये जाऊन बुकिंग करू शकतात. ग्राहक www.Harley-Davidsonx440.com या वेबसाइटला भेट देऊन मोटरसायकल ऑनलाइन बुकिंगही करू शकतात.

ही मोटरसायकल डेनिम, विविड आणि एस अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याची किंमत २,३९,५०० रुपये (डेनिम), २,५९,५०० रुपये (विविड) आणि २,७९,५०० रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT