Hero MotoCorp  Saam Tv
लाईफस्टाईल

Hero MotoCorp : हिरो मोटोकॉर्पकडून भारतातील पहिल्‍या अत्‍याधुनि‍क प्रिमिअम डिलरशिपचे उद्घाटन

Hero MotoCorp Inauguration : केरळमधील उत्साहपूर्ण शहर कालिकतमध्‍ये त्‍यांचे पहिले प्रिमिअम डिलरशिप 'हिरो प्रीमिया'चे उद्घाटन केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hero Motocrop Launch :

प्रिमिअम ग्राहक अनुभवाच्‍या नवीन युगाला चालना देत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज केरळमधील उत्साहपूर्ण शहर कालिकतमध्‍ये त्‍यांचे पहिले प्रिमिअम डिलरशिप 'हिरो प्रीमिया'चे उद्घाटन केले.

कालिकतमधील ऑटो हबमध्‍ये स्थित हिरो प्रीमिया सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांकरिता अद्वितीय प्रिमिअम विक्री व सेवा अनुभव निर्माण करण्‍यामध्‍ये सहाय्यक भूमिका बजावेल. त्यांनी नवीन ऑटोमोटिव्‍ह अनुभव देण्‍याचे वचन देत हिरो प्रीमियामध्‍ये आधुनिक आर्किटेक्‍चर, लक्षवेधक डिझाइन आणि सर्वसमावेशक आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा समावेश आहे. दर्जात्‍मक प्रिमिअम मालकीहक्‍क अनुभव देत व्‍यावसायिकदृष्‍ट्या प्रशिक्षित विक्रीसल्‍लागारांची टीम मौल्‍यवान ग्राहकांना त्‍यांच्‍या गतीशीलता गरजांनुसार वै‍यक्तिकृत विक्री सल्‍ला देईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिरो (Hero) प्रीमिया हिरो मोटोकॉर्पच्‍या प्रिमिअम उत्‍पादनांच्‍या श्रेणीला दाखवेल, ज्‍यामध्‍ये नवीन लाँच करण्‍यात आलेली फ्लॅगशिप मोटरसायकल करिझ्मा एक्‍सएमआरचा समावेश आहे. शहरी प्रवाशांसाठी कार्यक्षम व हरित पर्याय प्रदान करत हिरो प्रीमिया इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्‍यूशन्‍ससाठी वाढत्‍या मागणीची पूर्तता करणाऱ्या व्हिडा V1स्‍कूटर्सना देखील दाखवेल. ग्राहक हिरो मोटोकॉर्पची पहिली सह-विकसित केलेली मोटरसायकल (Motor Cycle) हार्ले-डेव्हिडसन X440 चा देखील अनुभव घेऊ शकतात.

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत हिरो मोटोकॉर्पच्‍या इंडिया बिझनेस युनिटचे मुख्‍य व्‍यवसाय अधिकारी श्री. रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ''आम्‍ही भारतातील (India) आमच्‍या पहिल्‍या प्रिमिअम डिलरशिपचे दरवाजे खुले करत असताना आमच्‍या मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सचे वैविध्‍यपूर्ण प्रदर्शन दाखवण्‍यासह प्रिमिअम, नाविन्‍यपूर्ण व शाश्‍वत असलेल्‍या भावी गतीशीलतेला देखील दाखवत आहोत. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये आमची कंपनी भारतभरातील प्रिमिअम रिटेल अनुभव अधिक प्रबळ करताना पाहायला मिळेल.

यंदा लाँच करण्‍यात आलेली नवीन प्रिमिअम उत्‍पादने - करिझ्मा एक्‍सएमआर व हार्ले-डेव्हिडसन X440 सह हिरो मोटोकॉर्पचा प्रिमिअम पोर्टफोलिओ पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ दिसत आहे आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की हिरो प्रीमिया हे आमचे नवीन प्रिमिअम रिटेल चॅनेल आगामी महिन्‍यांमध्‍ये अधिकाधिक यश संपादित करण्‍यासाठी सज्‍ज आहे. एकाच छताखाली ग्राहकांना सर्वसमावेशक ब्रॅण्‍ड अनुभव देत हिरो प्रीमिया पॉइण्‍ट ऑफ सेल असण्‍यासोबत अद्वितीय उच्‍च दर्जाचा ब्रॅण्‍ड अनुभव देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला सार्थ देखील ठरवतो.''

1. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान

ऑनलाइन व ऑफलाइन टचपॉइण्‍ट्सचा समावेश असलेला एकसंधी प्रवास, तसेच डिजिटल इंटरअॅक्टिव्‍ह मॉड्यूल्‍स व आधुनिक कन्फिग्‍युरेटर्सच्‍या सादरीकरणासह हिरो प्रीमिया ग्राहकांचा अनुभव अधिक लक्षवेधक करण्‍याची खात्री देते. क्‍लाऊड तंत्रज्ञान व ऑगमेण्‍टेड-रिअॅलिटीचे उपयोजन ग्राहकांना त्‍यांच्‍या पसंतीनुसार त्‍यांची स्‍वप्‍नवत मोटरसायकल व स्‍कूटरचे मूल्‍यांकन व निवड करण्‍यास मदत करेल.

2. हिरो मोटोकॉर्पचे 3S

जवळपास ३,००० चौरस फूट जागेवर धोरणात्‍मकरित्‍या स्थित हिरो प्रीमिया सर्व प्रक्रियांमध्‍ये सेल्‍स, सर्विस व स्‍पेअर-पार्टसचे अपवादात्‍मक मानक देईल, ज्‍यामधून ग्राहकांना दर्जात्‍मक विक्री प्रिमिअम मालकीहक्‍क अनुभवाची खात्री मिळेल.

3. व्हिज्‍युअल ओळख

हिरो प्रीमिया समकालीन ब्रॅण्‍ड एलीमेंट्सच्‍या माध्‍यमातून नवीन व्हिज्‍युअल ओळखीमध्‍ये अत्‍याधुनिक आभाची भर करते. डिलरशिपच्‍या नवीन स्‍वरूपाची संकल्‍पना दैनंदिन साहसी राइड आणि टिकाऊपणा लक्षात घेत तयार करण्‍यात आली आहे.

हिरो प्रीमियाच्‍या फ्रण्‍ट फेशियामध्‍ये अद्वितीय प्रिमिअम डार्क फॅकेडचा समावेश आहे, ज्‍यामधून आधुनिकता दिसून येते. इंटीरिअरमध्‍ये निसर्गामधून प्रेरित डिझाइन एलीमेंट्सचा समावेश आहे, जसे माऊंटेन ट्रेल्‍स, रॉक वॉल आणि भव्‍य राफ्टर सिलिंग. इंटीरिअरमधील नवीन फर्निशिंग्‍ज आणि आकर्षक रंगसंगती व टोन्‍स ग्राहकांसाठी स्‍वागतार्ह वातावरणाची निर्मिती करतात. उच्‍च दर्जाचे आदरातिथ्‍य लाऊंज आरामदायी व प्रिमिअम वातावारण देते.

4. प्रॉडक्‍ट डिस्‍प्‍ले झोन्‍स

अर्बन व स्‍ट्रीट मोटरसायकलिंग झोन्‍समध्‍ये इलेक्ट्रिक गतीशीलता व परफॉर्मन्‍स मोटरसायकल्‍सचा समावेश असेल, तर इतर निम्‍म्‍या डिस्‍प्‍लेंमध्‍ये लाइफस्‍टाइल व शोधाशी संबंधित रोडस्‍टर्स व अॅडवेन्‍चर मोटरसायकल्‍सचा समावेश असेल. हिरो प्रीमियामध्‍ये हिरो मोटोकॉर्प व हार्ले-‍डेव्हिडसन X440 च्‍या लाइफस्‍टाइल, मर्चंडाइज व अॅक्‍सेसरीजच्‍या व्‍यापक श्रेणीचा देखील समावेश असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

Maharashtra Politics: पालिकांवर नजर, ठाकरेसेनेचं शक्तीप्रदर्शन, भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं

SCROLL FOR NEXT