Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, रोहित पवार यांची पत्रकार परिषद, भारत बंद, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Parbhani: परभणी महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवड आज होणार

परभणी महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवड आज होणार आहे. असे असताना काल रात्री काँग्रेसचे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्या मध्ये बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत स्थानिक पातळीवर 2 नेत्याने एकत्र राहण्याचा निर्णय झाला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे चा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर होणार हे निश्चित झाले आहे त्यामुळे शिवसेनेच्या या 6 नगरसेवकमधून महापौर निवडला जाईल.तर काँग्रेसच्या 3 नगरसेवकमधून उपमहापौर निवडला जाईल

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस पुण्यात उकडा कायम...

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील किमान तापमान स्थिर असून कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे त्यामुळे सकाळी आणि रात्री काहीसा गारवा असला तरी दुपारी उन्हाचा कडाका जाणवत आहे पुढील दोन दिवस हवामानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Pune: पुण्याच्या महापौरांची पालिका प्रशासनाला तंबी...

नवनियुक्त महापौर मंजुषा नागपूर यांनी आपल्या पहिल्याच पत्रात पालिका प्रशासनाला इशारा देऊन शहरातील प्रमुख नाले पावसाचे पाणी वाहून येणाऱ्या वाहिन्यांची साफसफाई 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य असून यामध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याची तंबीकली आहे याशिवाय नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती आणि पावसाळ्यातील सुरक्षिततेबाबत सविस्तर अहवाल तीन दिवसात सादर करावा असा आदेशही दिला आहे.

MHT-CET: सीईटी प्रवेश नोंदणीला मुदतवाढ...

एमसीए हॉटेल मॅनेजमेंट साठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत...

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026 27 साठी घेण्यात येणाऱ्या एमसीए आणि एमएचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Maharashtra Live News Update: पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी?

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी नाचवल्या तलवारी? भाजप युवा मोर्चाकडून कार्यक्रमाला आक्षेप

सुदान च्या विद्यार्थ्यांचा सादरीकरणाला विरोध

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात वर्ल्ड कल्चर फेस्टीव्हल

तसेच बांगलादेश च्या विद्यार्थ्यांनी लावलेला स्टॉल भाजप युवा मोर्चा ने लावला उधळून

पुण्यात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात स्टॉल आणि सादरीकरण

पुणे शहराच्या भाजप युवा मोर्चाकडून निषेध व्यक्त

भाजप युवा मोर्चाकडून कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार

भंडारा हादरले! डॉक्टरच्या मदतीने चालणारा नवजात बालिकेचा तस्करीचा बाजार उघड

भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे नवजात बालिकेची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन वरठी पोलिसांनी पाच आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यात डॉ नितेश वाजपेयी बालाजी क्लिनिक रामनगर गोंदिया समावेश आहे.२ फेब्रुवारी २०२६ रोजी महिला व बाल विकास विभागाच्या 'चाइल्ड हेल्पलाइन'वर माहिती मिळाली की, पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे (वय ४४) या महिलेने १० दिवसांची नवजात बालिका बेकायदेशीररित्या घरी आणली आहे.

मावळचा लाल गुलाब निघाला परदेशात

प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल गुलाबाला परदेशी नागरिकांची भुरळ पडलेली आहे. त्यामुळे परदेशात मोठ्या प्रमाणावर मावळतील गुलाबाला मागणी वाढली आहे. सध्या मावळात गुलाब फुले परदेशात पाठवण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परदेशात मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिले आहे..

अहिल्यानगरमध्ये गोळीबार

अबरार शेख याला मनपा निवडणुकीच्या वेळेस किरकोळ कारणातून मारहाण करण्यात आली होती त्यावेळी अबरार शेख याने पोलिसांमध्ये तक्रार केली होती याचा राग मनात धरून अबरार शेख यांच्यावर रात्री अकराच्या सुमारास चार गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती..

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आदेशाची प्रतीक्षा

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शेतकरी कर्ज निवारण योजना लागू केली जाणार आहे,या दृष्टीने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती घेतली जात असून याच वेळी राष्ट्रीयकृत बँकांकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची कुठलीच माहिती अद्याप गोळा झालेली नाहीत, यामुळे शेतकरी कर्ज निवारण योजना लागू झाली तर याचा लाभ जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार काय असा प्रश्न विचारला जाताहेत यातून राष्ट्रीयकृत बँकांमधील शेतकरी संभ्रमात सापडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com