Today Horoscope
Today HoroscopeSaam tv

Today Horoscope: अनोळखी लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका; या ४ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण

Zodiac signs happy moments astrology: आज १२ फेब्रुवारी असून हा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. तर काही राशींना या काळात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आजचा दिवस कोणत्या राशींसाठी लकी ठरणार आहे ते पाहूयात.
Published on

मेष रास

आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणारआहे. तुम्ही तुमच्या कामात काही बदल करू शकता. तुमचा बॉस तुमच्यावर खूश होईल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करू शकता.

वृषभ रास

आज तुम्हाला तुमच्या कामात संयम बाळगण्याची गरज आहे. सासरच्या व्यक्तींकडून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या आईला धार्मिक सहलीवर घेऊन जाऊ शकता.

मिथुन रास

आजचा दिवस शहाणपणा आणि विवेकाने निर्णय घेण्याचा असणार आहे. प्रेमात असलेल्यांना त्यांच्या नातेसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. बाहेरच्या व्यक्तीच्या आगमनामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे.

कर्क रास

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकणार आहे. तुम्हाला तुमचा आळस दूर करावा लागणार आहे. तुमच्या नोकरीशी संबंधित कामासाठी तुम्हाला परदेशात जावं लागू शकतं.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रतिष्ठा वाढवण्याचा असणार आहे. तुम्ही अनावश्यक राग टाळला पाहिजे. तुमच्या मुलाच्या बिघडत्या आरोग्याबद्दल तुम्हाला काळजी करावी लागणार आहे. तुमच्या लग्नात येणाऱ्या कोणत्याही समस्या दूर होणार आहे.

कन्या रास

आजचा दिवस तुमच्यासाठी सर्जनशील प्रयत्नांद्वारे प्रसिद्धी मिळवण्याचा असणार आहे. पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका. प्रेमींमध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात.

Today Horoscope
Sun-Mangal Yuti: 18 वर्षांनी तयार होणार मंगळ-सूर्याची युती; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

तूळ रास

आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचं पालन होणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे.

वृश्चिक रास

आजचा दिवस तुमच्या वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा असणार आहे. तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या तुमच्या कानावर पडणार आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मतांचाही पूर्ण विचार करणार आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अडचणी येतील.

धनु रास

आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न उत्कृष्ट असतील. तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा अधिकार वाढी शकतो. तुमचे गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

मकर रास

आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. घरातून कोणतीही महत्त्वाची माहिती बाहेर टाकू नका. अनावश्यक संघर्ष उद्भवू शकतात. तुम्ही अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. कायदेशीर बाब समस्या बनू शकणार आहे.

Today Horoscope
Laxmi Narayan Yog: 1 वर्षानंतर मंगळ राशीत बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

कुंभ रास

आजचा दिवस तुमच्या कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी असणार आहे. तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यातून चांगले पैसे मिळणार आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

मीन रास

आजचा दिवस समस्यांपासून मुक्ततेचा असणार आहे. तुम्ही तुमची कामं पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करू शकणार आहात. तुम्ही इतरांना दिलेलं कोणतंही वचन वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात.

Today Horoscope
Laxmi Narayan Rajyog: फेब्रुवारीपासून सुरु होणार या राशींचे 'अच्छे दिन'; शनीच्या राशीत बनणार लक्ष्मी नारायण राजयोग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com