Heart Blockage Symptoms google
लाईफस्टाईल

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास कोणत्या समस्या जाणवतात? यावर कोणती चाचणी योग्य?

Heart Blockage Symptoms: हार्ट ब्लॉकेजच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे आणि पायांमध्ये सूज येणे यांचा समावेश असू शकतो.

Saam Tv

हार्ट ब्लॉकेजच्या लक्षणांमध्ये छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे आणि पायांमध्ये सूज येणे यांचा समावेश असू शकतो. तर बाकीच्या लक्षणांमध्ये चक्कर येणे, बेशुद्ध होणे आणि अनियमित ह्दयाचे ठोके यांचा समावेश असण्याची शक्यता असते. जेव्हा तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी वाढायला सुरुवात होते. त्यावेळेस हार्ट ब्लॉकेजच्या नसा ब्लॉक व्हायला सुरुवात होते.

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे कधी दिसतात?

ह्दयाच्या धमन्यांमध्ये 70% किंवा त्याहून अधिक अडथळा असल्यास हार्ट ब्लॉकेजची गंभीर लक्षणे जाणवायला सुरुवात होते. त्यासोबत शरीरात रक्त ऑक्सिजन योग्यरित्या वाहत नाही, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हाला पायऱ्या चढताना, वेगाने चालताना किंवा धावताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हार्ट ब्लॉकेजचे लक्षण असू शकतं.

तुम्हाला जर थोडं चालून दम लागला आणि तुम्ही थांबलात तर काही काही ही लक्षणे कमी होऊ शकतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही थांबल्याने तुमचा आजार पुर्ण पणे बरा झाला आहे. यावर वेळीच उपचार करणं महत्वाचं आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला हार्ट अटॅक यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे

छातीत दुखणे

तुम्हाला अचानक छातीत आकडल्यासारखे, दाबाव, आकडल्यासारखे किंवा दुखत असेल तर हे हार्ट ब्लॉकेजचे लक्षण असू शकतं.

श्वास घेण्यास त्रास

एक्सरसाइज करताना तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हे सुद्धा हार्ट ब्लॉकेजचे लक्षण असू शकतं.

थकवा

तुम्हाला काही काम न थकवा जाणवत असेल तर हे हार्ट ब्लॉकेजचे लक्षण असू शकतं.

चक्कर येणे

डोके दुखी, सतत झोपून राहणे आणि मग उठल्यावर चक्कर येणे हे लक्षण हार्ट ब्लॉकेजचे लक्षण असू शकतं.

हार्ट ब्लॉकेज ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्यात?

तुम्हाला जर वरील माहितीत नमुद केलेल्यांपैकी तुम्हाला जर कोणती लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. यासाठी तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह चाचणी म्हणजे अॅंजिओग्राफी. ही एक विशेष प्रकारची एक्स-रे चाचणी आहे, जी तुमच्या धमन्यांमधील ब्लॉकेजची स्थिती दर्शवते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT