Heart Attack Risk, Heart Attack Symptoms Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack Risk : महिलांमध्ये वाढतेय हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण! वेळीच घ्या काळजी, डॉक्टरांनी दिला सल्ला

Heart Attack Symptoms : महिलांना हृदयविकाराचा झटका कारणे ही पुरुषांपेक्षा खूप वेगळी असू शकतात आणि त्यांची लक्षणे देखील छातीत दुखणे आणि अस्वस्थतेशी जुळून येतीलच असे नाही.

कोमल दामुद्रे

Heart Attack Risk in Women :

महिलांना हृदयविकाराचा झटका कारणे ही पुरुषांपेक्षा खूप वेगळी असू शकतात आणि त्यांची लक्षणे देखील छातीत दुखणे आणि अस्वस्थतेशी जुळून येतीलच असे नाही. महिलांमध्ये मळमळ, थकवा, धाप लागणे आणि पाठ किंवा जबड्यात दुखणे यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता असते.

यामुळे अनेकदा चुकीचे निदान होऊ शकते किंवा उपचारात विलंब होऊ शकतो, ज्यामुळे स्त्रियांना (women) गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया वैद्यकीय मदत घेण्यास विलंब करतात किंवा त्याबाबत वैद्यकिय सल्ला घेण्यासाठी संकोच बाळगतात. विशेषत: स्त्रियांना त्यांच्या हृदयविकाराच्या जोखीम घटकांबद्दल अधिक जागरूकता आणि साक्षरतेची गरज आहे.

मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे सल्लागार कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे म्हणतात स्त्रियांना हृदयविकाराचा झटका येण्यासाठी अनेक जोखीम घटकांचा सामना करावा लागतो. ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. एक महत्त्वाचा घटक म्हणजे ल्युपस किंवा संधिवात सारख्या स्वयंप्रतिकार रोगांची लागण, ज्यामुळे शरीरात जळजळ वाढू शकते आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो.

रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका (Heart Attack) वाढतो. मानसिक आरोग्याच्या समस्या जसे की नैराश्य आणि दीर्घकालीन तणाव देखील स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

संशोधनानुसार आहाराच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यासारख्या जीवनशैलीच्या बदलांमुळे देखील हृदयरोगास आमंत्रण मिळते. स्त्रियांना या कमी-ज्ञात जोखीम घटकांची जाणीव माहिती आवश्यक आहे आणि त्यांच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्यक आहे.

स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका रोखण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे नियमित शारीरिक हालचालींना प्राधान्य देणे. वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या क्रियांमध्ये गुंतल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.

याव्यतिरिक्त, फळे, भाज्या आणि तृणधान्याचा आहारात समावेश केल्यास हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो. स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तणावाची पातळीचे व्यवस्थापन करणे.

दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने हृदयविकाराच्या समस्येस तोंड द्यावे लागते, त्यामुळे योगाचा सराव किंवा मेडीटेशन यासारख्या पर्यायांचा अवलंब करणे योग्य राहिल. महिलांनी रक्तदाब, कोलेस्टेरॉलची पातळी आणि एकूणच हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यातील समस्या लवकर टाळणे शक्य होईल आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT