Winter Heart Care  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Heart Care : हिवाळ्यात हार्टअटॅकचे प्रमाण वाढते, त्यापासून बचाव कसा करायचा?

हिवाळ्यात हार्टअटॅकच्या रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसून येते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Winter Heart Care : हिवाळ्यात हार्टअटॅकच्या रुग्ण संख्येत वाढ झालेली दिसून येते. बदलती जीवनशैली,दगदगीचे जीवन तसेच वातावरणातील बदल हे कारणीभूत आहेत. पूर्वी जास्ती वय झालेल्या लोकांना हार्टअटॅक येत होता परंतु आता तरुणांन मध्ये सुद्धा हार्टअटॅकचे प्रमाण वाढलेले दिसून येते.

हिवाळ्यात तापमान कमी होते आणि शरीर थंड (Cold) पडते त्यामुळे ब्लड प्रेशर वाढीचा त्रास होतो. हिवाळ्यात रक्त घट होते त्यामुळे त्याच्या सहज गाठी बनतात आणि रक्तभिसरणात त्रास होतो त्यामुळे थंडीत हार्टअटॅकचे प्रमाण अधिक वाढते. पुढल काही टिप्स (Tips) वाचून तुम्ही हार्टअटॅक पासून सावध राहू शकता.

थंडीचा संपर्क टाळा -

हिवाळ्यात तापमान कमी होऊन थंडी खूप जास्ती वाढते अशा वेळेस आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. थंडीमुळ रक्ताच्या गाठी सहज बनतात म्हणून रक्तवाहिन्या बंद होतात आणि रक्त प्रवाहात अडथळा येतो. त्यामुळे थंडीत आपण योग्य काळजी घेऊन थंडीचा संपर्क टाळला पाहिजे. उबदार कपडे, व्यायाम करून आपण उष्णता निर्माण करू शकतो.

मानसिक ताण कमी करा -

जास्ती ताण नाही घेतला पाहिजे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. रागवने,चिडचिडपणा करणे यामुळे हृदयविकराचा झटका येण्याची शक्यता असते. नेहमी प्रसन्न राहिले पाहिजे त्यामुळे आपले आरोग्य व्यवस्थित राहते. म्हणून अधिक ताण घेऊ नये.

धूम्रपान, तंबाखूचे सेवन टाळा -

ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी धूम्रपान करणे पूर्णपणे बंद केले पाहिजे. थंडीमध्ये लोक अधिक धूम्रपान करतात त्यामुळे थंडी वाजत नाही पण त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होतो. रकतवाहिन्यांमध्ये त्रास होऊन अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

तेलकट खाणे बंद करा -

आपल्या आहारात तेलकट पदार्थचा समावेश करू नका तसेच अधिक चरबीयुक्त मांस खाणे टाळा. बाहेरील फास्ट फूड खाणे बंद केले पाहिजे. जास्ती तेलकट पदार्थ खालल्यावर त्याचा परिणाम हृदयावर होत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC चा नवा नियम! आता कॅन्सलेशन चार्ज न देता बुक करता येणार दुसऱ्या दिवशीचं तिकीट; प्रवाशांना काय होणार फायदा?

Maharashtra Live News Update: मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांना जीवे मारण्याची धमकी

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत तब्बल 500 विद्यार्थी अडकले |VIDEO

Pune: जिल्हा न्यायालयात तरुणाची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून मारली उडी; पुण्यात खळबळ

Leopard Attack : अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर बिबट्याची झडप; उसाच्या शेतात आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT