Heart Attack
Heart Attack Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack : तरुणांमध्ये सतत वाढणाऱ्या हृदयविकाराचे कारण आले समोर, तज्ज्ञ म्हणतात...

कोमल दामुद्रे

Heart Attack : हल्ली आठवड्याभरात हृदयविकाराचा झटक्याची एखादी तरी घटना आपल्याला कानी ऐकू येते. नुकतेच याचा विळखा तरुण पिढीला अधिक पडला आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव व व्यस्त जीवनशैली (Lifestyle) यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते

पण यात नुकतेच एक कारण असे समोर आले आहे की, कोरोनाच्या नंतर हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढले. परंतु, कोरोनामुळे हृदयविकार (Heart attack) वाढण्याचे कारण काय? याविषयी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साथीच्या आजारानंतर हार्ट थ्रोम्बोसिसची समस्या खूप वाढली आहे. त्यामुळे हल्ली अनेक तरुणांचे मृत्यूही होत आहेत. थ्रोम्बोसिस म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे. यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्त नीट वाहत नाही, त्यामुळे अटॅक येण्याचा धोका असतो. (Latest Marathi News)

थ्रोम्बोसिसमुळे हृदयविकाराचा झटका येतो असे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय थ्रोम्बोटिक स्ट्रोक देखील होऊ शकतो. या दोन्हीमुळे अचानक मृत्यू होऊ शकतो. कोविडमुळे गंभीर आजारी झालेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे.

राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. अजित जैन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीमुळे हृदयाशी संबंधित आजारही कोविडची दीर्घकाळ चालणारी समस्या बनत आहेत. व्हायरसने हृदयाचे अनेक प्रकारे नुकसान केले आहे, त्यामुळे थ्रोम्बोसिस ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. त्यामुळे हृदयाचे नुकसान होत आहे.

मानसिक समस्यांची वाढती प्रकरणे

डॉ जैन यांच्या म्हणण्यानुसार, कोविड महामारीपासून तरुणांमध्ये मानसिक तणाव खूप जास्त दिसत आहे. वाढत्या तणावामुळे हृदयाशी संबंधित आजारही होतात. हृदयविकार वाढण्यामागे खराब मानसिक आरोग्य हे देखील एक कारण आहे. याशिवाय मधुमेह आणि लठ्ठपणामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो. साखरेची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, कमी वयात लोकांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

डॉ. जैन म्हणतात की हृदयविकार टाळण्यासाठी, लोकांनी दर तीन महिन्यांनी हृदय तपासणी करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी लिपिड प्रोफाइल चाचणी आणि छातीची सीटी करणे अधिक चांगले आहे. हे अतिशय अचूक माहिती देते. जर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल किंवा स्कॅनमध्ये हृदयाच्या कोणत्याही धमनीत ब्लॉक दिसून येत असेल तर अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करा

  • आहारात प्रथिने जीवनसत्त्वांचा समावेश करा आणि चरबी घेणे टाळा

  • धूम्रपान आणि दारूचे व्यसन टाळा

  • ताण घेऊ नका

  • जंक फूड टाळा आणि फळांचा आहारात समावेश करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Crime: संतापजनक! फिरण्यासाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीला लुटलं; निर्वस्त्र करत केली बेदम मारहाण

Lok Sabha 2024: लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान; महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात होणार चुरशीच्या लढती

Horoscope Today : मेहनतीचे मिळणार फळ, प्रवासातून पालटणार भाग्य; तुमच्यासाठी कसा जाईल सोमवार?

Rashi Bhavishya: वृषभसह 4 राशींसाठी सोमवार ठरणार लकी, तुमची रास?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT