Child Heart Problem : व्हिडीओ गेम्सच्या अतिवापरामुळे मुलांच्या हृदयावर होऊ शकतो परिणाम ! संधोनातून धक्कादायक खुलास

तंत्रज्ञानाच्या बदलत जाणाऱ्या युगानुसार अनेक नवनवीन सॉफ्टवेअर फोनमध्ये अपडेट होतात.
Child Heart Problem
Child Heart Problem Saam Tv

Child Heart Problem : कोरोनाच्या काळापासून ऑनलाइन झालेल्या अभ्यासासाठी मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. तंत्रज्ञानाच्या बदलत जाणाऱ्या युगानुसार अनेक नवनवीन सॉफ्टवेअर फोनमध्ये अपडेट होतात. मुलं त्याचा वापर अगदी गेम खेळण्यासाठी करतात. ते त्यात इतके गुंतले जातात की, त्यांना आपण काय करतो हे देखील कळत नाही.

हल्ली प्रत्येक मुलाकडे स्मार्टफोन (Smartphone) हा असतो. त्यात मुलांना काही वेळेस व्हिडीओ गेम खेळायला आवडतात. आपल्यापैकी अनेकजण असतील ज्यांनी लहानपणी व्हिडीओ गेम्स खेळले असतील. व्हिडिओ गेम्स मुलांच्या (Child) मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरतात, पण त्यांचे व्यसन घातक ठरू शकते.

ऑस्ट्रेलियात केलेल्या एका अभ्यासातून असे समोर आले आहे, की व्हिडिओ गेमचे व्यसन तुमच्या मुलांचे हृदयरोगी बनवू शकते. इतकंच नाही तर तुमच्या मुलांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. (Latest Marathi News)

Child Heart Problem
Child Obesity: पालकांनो, मुलांचे वाढलेले वजन ठरु शकते आरोग्याला धोकादायक; वेळीच 'या' गोष्टींवर लक्ष द्या !

व्हिडिओ गेम्स धोकादायक का आहेत?

व्हिडिओ गेम्स आणि त्यांचा मुलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम यावर एक अभ्यास करण्यात आला. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अभ्यासानुसार, व्हिडिओ गेममध्ये दाखवल्या गेलेल्या धोकादायक स्टंट दरम्यान, मुलांच्या हृदयाची गती वाढते आणि खूप वेगाने कमी होते, जे त्यांच्या वयासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. याचा मुलांच्या हृदयावर वाईट परिणाम होतो.

अभ्यासातून हे दिसून आले?

व्हिडीओ गेम्स पाहताना बेशुद्ध पडणाऱ्या मुलांवर हार्ट हेल्थ या विषयावर प्रसिद्ध होणाऱ्या 'हार्ट रिदम' या जर्नलमध्ये नुकतेच संशोधन प्रसिद्ध झाले आहे. हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या द हार्ट सेंटर फॉर चिल्ड्रनचे प्रमुख क्लेअर एम लॉली यांनी केले आहे. या संशोधनात इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम स्टंट आणि वॉर गेम्स खेळताना बेहोश झालेल्या 22 मुलांच्या हृदयाच्या आरोग्याचा सखोल अभ्यास करण्यात आला.

Child Heart Problem
Child Care Tips : मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखायचे आहे ? 'हे' पदार्थ मुलांच्या ताटात वाढा

मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता

या संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लॉली म्हणाले की संशोधनादरम्यान त्यांना अशी प्रकरणे देखील आढळली ज्यामध्ये मल्टीप्लेअर वॉर गेमिंग खेळताना मुलांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने उघड झाले.त्यांनी सांगितले की, जर एखाद्या मुलाला असा त्रास होत असेल किंवा व्हिडीओ गेम खेळताना त्याला चिंताग्रस्त आणि श्वसनाचा गंभीर त्रास होत असेल, तर मुलाला तातडीने हृदयरोग तज्ज्ञांना दाखवावे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com