Doctors highlight rare but possible heart attacks in children Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack in Kids: लहान मुलांना हार्ट अटॅक येतो का? काळजी काय घ्यावी, काय सांगतात तज्ज्ञ?

Children Heart Attack Risk: लहान मुलांची बॉडी आणि हार्ट तशी स्ट्रॉंग असतात. जन्मजात आजार असताना बऱ्याचदा वयाच्या चाळीशीत गेल्यावर वयात पहिल्यांदा ह्या घटना समोर येतात.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील एका गावातील 9 वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शाळेत डबा खाताना ९ वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका आला त्यात तिचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षात लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, पण लहान मुलांना हृदयविकाराचा झटका येतो का? किंवा का हार्ट अटॅक येण्याचे प्रकरणं का वाढतायेत.याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ. तसेच काय काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ.

राजस्थानमध्ये मृत पावणाऱ्या मुलीचं नाव, प्राची कुमावत (वय वर्ष ९) आहे. शाळेत डबा खाताना ती खाली पडली. त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण खरंच लहान मुलांना हार्ट अटॅक येतो का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याबाबत नागपूरमधील कॉर्डिओलॉजिस्ट,(हृदयरोगतज्ज्ञ) डॉ. अमर आमले, यांनी माहिती देत अनेकांची शंकांचे निरसन केले आहे.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमर आमले म्हणतात, नऊ वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येणं अशक्य आहे, पण त्याला जन्मताच काहीतरी हार्टशी संबंधित आजार असू शकतो. शेवटी हार्ट अटॅकने मृत्यू झाले असेच आपण म्हणतो. लहान हार्टची तपासणी करताना जर डॉक्टरांना आवाज ऐकल्यास घर घर किंवा हार्टबीट व्यतिरिक्त आवाज ऐकू येऊ शकतो.

९ वर्षाच्या मुलीला हार्ट अटॅक आला असेल तर त्या मुलीला काहीतरी लहानपणापासूनच जन्मजात अडचण असावी. त्यामुळे अशा पद्धतीने हार्ट अटॅक आला असावा. लहान मुलाचं शाळेमध्ये आम्ही हार्ट स्क्रीनिंग करतो, तेव्हा हजार मुलांमागे १० ते १५ मुले असे मिळतात ज्यांना हार्टमध्ये स्नायू जाड असणे, किंवा छिद्र असणे असे दिसून येते. त्यामुळे लहानपणापासून आजार असल्यानेच काहीतरी घडलं असू शकतात. बालरोग तज्ञ जेव्हा लहान मुलांना तपासात तेव्हा त्यांना ते लक्षात येत असतं.

अशा घटना घडू नये, यासाठी शाळा पातळीवर स्कूल हेल्थ प्रोग्राम राबवले गेले पाहिजे. लहान मुलांची बॉडी आणि हार्ट तसे मजबूत असतात.जन्मजात आजार असताना बरेचदा वयाच्या चाळीशीत गेल्यावर वयात पहिल्यांदा या घटना समोर येतात. त्यामुळे ही लक्षणे पकडणं कठीण असत. क्लीनिकल स्किल जर चांगले असल्यास याचे निदान वेळीच होऊ शकतं.

लहान मुलांच्या बाबतीत काळजी काय घ्यावी

ज्याच्या कुटुंबात हार्ट अटॅकची हिस्ट्री असेल. आई-वडिलांना हार्टशी संबंधित काही आजार असेल. दम लागत असेल, वजन वाढत नसेल, किंवा अशा पद्धतीची हार्टच्या आजार संबंधित हिस्टरी कुटुंबात असल्यास. तसेच लहानपणी वारंवार निमोनिया होणे, दमा होणे,अशी लक्षणे दिसल्यास इको करून घेतल्यास वेळीच आळा घातला जाऊ शकतो.

इको करून बाब निदर्शनास आल्यास त्यावर मॅक्रोस्कोपणे चिरफाड न करता, छोटीशी शस्त्रक्रिया करून उपचार होत असतो. 15 ते 20 मिनिटात ही प्रक्रिया पार पडत असून एका दिवसात सुट्टी सुद्धा होते, असं हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमर आमले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT