Heart Attack In Children  google
लाईफस्टाईल

Heart Attack In Children: तुमच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका? 37 लाख मुलांचा जीव धोक्यात

Heart Attack In Children : हल्ली हृदयविकाराचा झटका पाच वर्षांपासून ते 25-35 वयाच्या तरुणांमध्ये हृदयविकार दिसून येत आहे.

Girish Nikam

अलीकडच्या काही वर्षांत हृदयविकाराचा झटका हा फक्त वडिलधाऱ्यांपुरता मर्यादित नाही. अगदी पाच वर्षांपासून ते 25 वर्षांच्या तरुणांमध्ये हृदयविकार दिसून येतोय. विशेषता लहान मुलांमध्येही याचं प्रमाण पालकांची चिंता वाढवणारे आहे. पाहूया एक रिपोर्ट. तेजस्विनी या आठ वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अचानक चक्कर येऊन शाळेच्या कॉरिडॉरमध्ये ती कोसळली. या घटनेमुळ सारेच पालक हादरले आहेत.

मात्र तेजस्वीनीसारखाच तब्बत ३७ लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आलीय. त्यामुळे उतार वयातच हृदयविकार होतो असा समज होता. पण वास्तव काही वेगळं आहे. हल्ली हृदयविकाराचा झटका पाच वर्षांपासून ते 25-35 वयाच्या तरुणांमध्ये हृदयविकार दिसून येतोय. विशेषता लहान मुलांमध्येही याचं प्रमाण चिंता वाढवणारे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 दशलक्ष मुलांचे वजन जास्त आहे. अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे हृदयविकार होऊ शकतो. अशा जीवनशैलीमुळे वयाच्या 10 व्या वर्षापासून मुलांचं हृदय कमकुवत होऊ शकते. दहाव्या वर्षात मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू लागतात.त्यातच शाळेचा ताण, अपुरी झोप यामुळेही मुलांचं आरोग्य बिघडतं. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बालपणातील सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो

पालकांनी मुलांबाबत काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया

काळजी घ्या, हृदयविकार टाळा

बालपणातच मुलांना योग्य सवयी लावा

फास्ट फूड टाळा, व्यसन टाळणे

नैसर्गिकरीत्या पिकवलेलं अन्न खा

जेवणात पालेभाज्या, फळांचा वापर वाढवणे

दररोज किमान 45 मिनिटं व्यायाम हवा

किमान 6 ते 7 तास झोप हवी

ताण-तणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा

सोशल मीडियाचा वापर कमी करा, नाती जोपासा

मुलांना निरोगी जीवनशैलीच्या सवयी शिकवणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आणि याचाच कर्नाटकातील चामराजनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणाऱ्या तेजस्विनी बळी ठरल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्यावर भविष्य निर्भर आहे. अशा पिढीचं हृदय सुदृढ असणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

Back Pain: खुर्ची किंवा खराब पोस्चर नव्हे, मेंटल स्ट्रेसही बनू शकतो कंबरेच्या दुखण्याचं मोठं कारण

Maharashtra Live News Update : स्वतःची कारखानदारी वाचवण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलू नये

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, २५ वर्षे पक्षात काम केलेल्या माजी नगराध्यक्षाने हाती धरलं कमळ

४०-५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली, विद्यार्थी बसमध्ये अडकले, VIDEO

SCROLL FOR NEXT