cold showers blood pressure SAAM TV
लाईफस्टाईल

Cold water bath risk: हिवाळ्यात चुकूनही थंड पाण्याने करू नका अंघोळ, अन्यथा हॉर्ट अटॅकचा धोका, डॉक्टरांनी कुणाला दिला इशारा?

Heart patients cold water bath risk: डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे ही सवय हृदयविकार आणि मधुमेह रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. थंड पाण्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावतात आणि हृदयावर ताण येतो.

Surabhi Jayashree Jagdish

थंडीच्या दिवसात अनेकांना गरम-गरम पाण्याने अंघोळ करायला फार आवडतं. मात्र अशीही काही लोकं असताना ज्यांना थंडीत देखील गार पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. यामुळे आपण फ्रेश होतो आणि सुस्ती दूर होण्यासही मदत होते. मात्र प्रत्येकाचे शरीर सारखं नसतं आणि काही आजारांसह छोट्या दैनंदिन सवयी देखील आरोग्यावर परिणाम करू शकतात. हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी हिवाळ्यात अंघोळीच्या सवयी महत्वाच्या असतात.

अशा परिस्थितीत, या रुग्णांसाठी थंड पाण्याने आंघोळ करणं योग्य आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी का यावर तज्ज्ञांनी आपलं मत सांगितलं आहे.

हाय बीपीच्या रूग्णांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी का?

डॉक्टरांनी सांगितलं की, हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणं सामान्यतः उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी योग्य मानलं जात नाही. थंड पाण्याच्या संपर्कात आल्यावर शरीराच्या रक्तप्रवाहात अचानक बदल होऊ शकतात, अशावेळी शरीराला लवकर एडजस्ट करावं लागतं. या परिस्थितीत रुग्णांना अस्वस्थता किंवा चक्कर येऊ शकते. अचानक थंडीच्या संपर्कात आल्याने कधीकधी शरीरावर अधिक ताण येऊ शकतो, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक प्रमाणात काम करावं लागतं. ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

आयजीआयएमएसचे असोसिएट प्रोफेसर डॉ. गोविंद प्रसाद यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, उठल्यानंतर लगेच जास्त किंवा थंड पाणी प्यायल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. जर तुम्हाला अशी सवय असेल तर अर्धा किंवा एक ग्लास कोमट पाणी पिऊन राहा. थंडीच्या दिवसात तळलेलं आणि खारट पदार्थ खाणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव या सर्व कारणांमुळे रक्तदाब अनियंत्रित होतो.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयाच्या समस्यांची लक्षणं बहुतेकदा छातीत दुखण्याच्या स्वरूपात दिसून येत नाहीत. यामध्ये अचानक अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, सतत ढेकर येणं किंवा अस्वस्थता ही देखील लक्षणं दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

कोणती काळजी घेतली पाहिजे?

  • दररोज तुमचा रक्तदाब आणि ब्लड शुगर लेवल तपासा.

  • रिकाम्या पोटी किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर अंघोळ करू नका.

  • संतुलित आहार घ्या आणि पुरेसं पाणी प्या.

  • कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: झेंडावंदनाची तयारी करताना मुख्याध्यापकाचा मृत्यू, शाळेच्या प्रांगणात जागीच सोडले प्राण

Marathi Movie: प्रेमाच्या रेशमी धाग्यात गुंफली अभि–कृतिकाची केमिस्ट्री; 'लग्नाचा शॉट'मधील 'रेशमी बंध' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Budget 2026: सोने-चांदीचे दर स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात झेंडावंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापकाचा धक्कादायक मृत्यू

Blood Pressure: BP अचानक वाढतोय? घरीच करा रोज २ मिनिटे 'हा' व्यायम, मिनिटांत मिळेल आराम

SCROLL FOR NEXT