Fruits For Eyes Saam Tv
लाईफस्टाईल

Fruits For Eyes :ब्लू लाईटमुळे होतोय डोळ्यांना त्रास, आजच या फळांचा आहारात समावेश करा

Eye Care :डोळ्यांवर ताण पडल्यावर अनेक आजार होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fruits For Better Eye :

आजकाल बदलते वातावरण आणि जीवनशैलीचा आरोग्यावर खूप परिणाम होतो. सर्वजण कामात एवढे व्यस्त झालेत की त्यांना शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही. दिवसभर लॅपटॉपसमोर बसून अनेक आजार होत आहेत. लॅपटॉप समोर सारख काम केल्याने डोळ्यांना खूप त्रास होतो. अनेकांना तर चष्मादेखील लावावा लागतो.

डोळ्यांवर ताण पडल्यावर अनेक आजार होतात. त्याची काळजी न घेतल्याने दृष्टी कमकुवत होते. हे सर्व टाळण्यासाठी तुम्हाला चांगला सकस आहार, व्यायम आणि विश्रांतीची गरज असते. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात या फळांचा समावेश केल्यास तुमच्या डोळ्यांचा त्रास कमी होईल.

किवी

किवी हे फळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. हे फळ तुमची दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते. वयाच्या काही काळानंतर आपली दृष्टी आपोआप कमी होते. आपल्या डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी किवीचे सेवन करणे चांगले असते. किवीमध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन हे पिगमेंट्स असतात. हे डोळ्यांना निरोगी ठेवतात त्याचबरोबर किवीमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात. जे डोळ्यांना मोतीबिंदूसारख्या आजारापासून वाचवतात.

पपई

पपईचे सेवन करणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पपईमध्ये विटामिन ए आणि विटामिन सी असतात. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट असतात. हे दृष्टी सुधारण्यास मदत करते.

अ‍ॅवाकॅडो (avocado)

अ‍ॅवाकॅडो हे फळ शरीरासाठी चांगले आहे. यात विटामिन सी,ई,बी-६, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. हे दृष्टीसाठी चांगले असते. हे फळ बाजारात सहज उपलब्ध असते.

आवळा

आवळा हा डोळ्यांसाठी अत्यंत उत्तम मानला जातो. आवळ्यात अनेक गुणधर्म असतात. आवळ्यात भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. यामुळे डोळ्यांच्या रेटिनाच्या पेशी मजबूत होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती

Accident: ६ जिवलग मित्रांचा एकाच दिवशी करुण अंत, देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

Alkaline Water Benefits: अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? कोणी प्यावे आणि कोणी पिणे टाळावे? जाणून घ्या फायदे

NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Onion For High Cholesterol: रोज कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं? डॉक्टरांनी सांगितलं कोणी खाल्ला पाहिजे

SCROLL FOR NEXT