

Redmi स्मार्टफोन सीरीज लॉन्च होताच एका दिवसांत याची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. हा फोन 26 सप्टेंबर रोजी चीनमध्ये पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. याची सेल सुरू होताच हा फोन सुपरहिट ठरला आहे. सध्या हा फोन भारतात लॉन्च करण्यात आलेला नाही. तसेच देशात हा फोन कधी लॉन्च होणार, याची माहितीही कंपनीने अद्याप दिली नाही.
Redmi Note सीरीज Xiaomi साठी खूपच फायदेशीर ठरली आहे. कारण दरवर्षी ग्राहकाचे लक्ष Xiaomi या फोनच्या सीरीजकडे असते. Xiaomi मधील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन रेंजपैकी एक असलेल्या Redmi Note सीरीजने एक नवीन टप्पा गाठला आहे. एका तासांच्या आतच फोनचे 410,000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. शाओमीचे CEO लेई जून यांनी ट्वीट करुन Redmi च्या टीमचे कौतुक केले आहे.
Redmi Note 13 Pro सीरीजमध्ये तीन मॉडेल बाजारात लॉन्च
Redmi Note 13 Pro सीरीजमध्ये कंपनीने तीन मॉडेल लॉन्च केले आहेत. Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 1099 युआन (12614 रुपये), 1399 युआन (16,057 रुपये) आणि 1899 युआन (21,796 रुपये) आहे. पहिल्या सेल दरम्यान, Redmi Note 13 सीरीजच्या सर्व मॉडेल्सवर 100 युआनची सूट देण्यात आली होती. (Latest Marathi News)
या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास रेडमी नोट 13 प्रो आणि प्रो+ या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये MIUI 14 सह Android 13 देण्यात आले आहे. रेडमी नोटच्या प्रो मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मॉडेल 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. तर Pro+ मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 7200-Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
Redmi Note 13 Pro आणि Pro+ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 200 MP कॅमेरा देण्यात आलेला आहे. 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. प्रो मॉडेलमध्ये 67 W फास्ट चार्जिंगसह 5100mAh बॅटरी आहे. यामुळं फोन फास्ट चार्ज होतो. Pro+ मध्ये 120 W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी आहे, जी प्रो मॉडेलपेक्षा थोडी लहान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.