Mint Water Benefits in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचे पाणी, आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे

Pudina Water Benefits in Marathi: पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटकांसह औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे.

कोमल दामुद्रे

पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटकांसह औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात अनेक पेयांमध्ये पुदिनाही टाकला जातो. त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का? याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया पुदिन्याचे पाणी पिण्याचे आरोग्याला (Health) होणारे फायदे.

पुदिन्यात असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला अनेक फायदे देतात. याचे सेवन केल्याने उष्माघातापासून संरक्षण होते. त्यामुळे याचे पाणी (Water) पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

1. मळमळ

जर तुम्हाला मोशन सिकनेस किंवा मळमळ होत असेल तर उन्हाळ्यात (Summer Season) याचे सेवन करा. पुदिन्याचा गुणधर्म थंड असल्यामुळे आपल्याला आराम मिळतो.

2. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म

पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि रोझमॅरिनिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात.

3. रोगप्रतिकारशक्ती

पुदिन्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह भरपूर असते. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत होते.

4. ताण

तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे हे प्यायल्याने आराम मिळतो. यात असणारे गुणधर्म आरोग्याला बहुगुणी ठरतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: गर्लफ्रेंडसोबत वाजलं, संतापलेल्या बायफ्रेंडनं सपासप १८ वार केले; त्याआधी दुसरीसोबत ठेवले संबंध

Maharashtra Live News Update : निलेश घायवळ विरोधात "ब्लू कॉर्नर" नोटीस

....त्यासाठी इंदिरा गांधींना जीवाची किंमत मोजावी लागली, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

Breast cancer vaccine: ही लस ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे संपवू शकते; वाचा शरीरात कसा होतो बदल?

Prostate Cancer Signs: आतड्याला त्रास होतोय, वेळीच तपासणी करा; तज्ज्ञांनी सांगितली प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं अन् महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT