आजकाल बदलते वातावरण आणि राहनीमानामुळे अनेक आजार वाढताना दिसत आहेत. खाण्याच्या पिण्याच्या सवयींवर आपले आरोग्य अवलबूंन असते. त्यामुळे अनेक आजार होत आहे. त्यात प्रामुख्याने डायबिटिजचा समावेश आहे. डायबिटिजच्या रुग्णांसाठी खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये अनेक बदल असतात.
जगात डायबिटिजच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. या आजारात शुगर लेव्हलचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील अवयव कमकुवत होतात. डायबिटिज आजारावर कायमस्वरुपीचा इलाज नाही. परंतु आपल्या जीवनशैलीतील बदल आणि साखरेची पातळी स्थिर ठेवल्यास हा आजार आटोक्यात ठेवू शकतो.
या आजारात अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अतिप्रमाणात असणारे साखरेची पदार्थ शक्यतो खायचे नाही. डायबिटिजच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्याचे हे पदार्थ नक्की खा.
1. पालक चाट
पालकमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे पालक चाट खाल्ल्याने रक्तातील शुगर लेव्हल स्थिर राहते. पालकच्या पानांचा चाट खाणे हे डायबिटिजच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे. यामुळे तुमच्या आरोग्यास फायदा हाईल. हा पदार्थ तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता.
2. मसूर डाळ चीला
भारतात नाश्त्यात चीला हा पदार्थ नेहमी खाल्ला जातो. मसूर डाळ चीला हा डायबिटिजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मसूरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे शुगर नियंत्रित राहते. याशिवाय डाळींमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे हा पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगला आहे. या पदार्थासाठी मसूरच्या डाळीची पेस्ट करा. त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची, टॉमेटो, कांदा आणि आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यानंतर कमी तेलात हा चीला तयार करा. चीला हा घरी बनवण्यासाठी अत्यंत साधा आणि चविष्ट पदार्थ आहे.
3. भाजलेले काजू
ड्रायफ्रुट्स हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात. यामध्ये फॅट, कॅल्शियम आणि विटामिन्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे डायबिटिजच्या रुग्णांसाठी भाजलेले काजू खाणे फायदेशीर असते.
4. ग्रील्ड पनीर
डायबिटिजच्या रुग्णांसाठी ग्रील्ड पनीर खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते. नाश्त्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्ब्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
5. भेलपुरी
भेलपुरी खायला सर्वांनाच आवडते. ही भेलपुरी खाणे डायबिटिजच्या रुग्णांसाठी चांगले असते. कमी वेळेत आणि घरी बनवता येणारा हा चटपटीत पदार्थ तुम्हा खाऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.