

स्मार्टफोनमध्ये अॅपल हा सर्वोत्कृष्ट ब्रँड आहे. अॅपलने कमी कालावधीत स्मार्टफोनच्या जगात आपली वेगळी ओळख बनवली आहे. अॅपल हा फक्त आयफोनसाठी नव्हे तर इतर डिव्हासाठीदेखील प्रसिद्ध आहे. अॅपलने नुकतच नवीन वॉच लाँच केलं आहे.
अॅपलने १२ सप्टेंबरला झालेल्या वंडरलस्ट इव्हेंटमध्ये ना फक्त आयफोन 15 तर Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 लाँच केलं होतं. हे स्मार्टवॉच जीपीएस आणि सेल्युलर मॉडेलमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टवॉची फिचर्स आणि किंमत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Apple Watch Ultra 2 आणि Watch Series 9 ची किंमत
Apple Watch Series 9 वॉचची सुरुवातीची किंमत 41,900 रुपये आहे. तर Apple Watch SE किंमत 29900 रुपयांपासून सुरू आहे. Apple Watch Ultra 2 ची किंमत 89,900 रुपये आहे.
Apple Watch Series 9 स्पेसिफिकेशन
Apple Watch Series 9 मध्ये S9 चिप देण्यात आली आहे. या वॉचची बॅटरी १८ तासांपर्यंत चालते. हे डिव्हाइस Siri रिक्वेस्टला सपोर्ट देईल. Siri चा उपयोग करुन आरोग्याची सर्व माहिती मिळवण्यास मदत होईल. Apple Watch Series 9 चा डिस्प्ले 2000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल. अॅपल युजर्स डबल टॅप करुन फोन फोन उचलणे आणि इतर फिचर्स देण्यात आले आहेत.
Apple Watch Ultra 2 स्पेसिफिकेशन
अॅपलने आणखी एक वॉच बाजारात लाँच केले आहे. या वॉचचे नाव Apple Watch Ultra 2 आहे. यात 3,000 पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले आहे. या वॉचची बॅटरी ३६ तासांपर्यंत चालते. या वॉचमध्ये अल्ट्रा वॉच फेस, S9 चिप, ऑन डिवाइस सिरी, सायकलिंग फीचर्स, फ्लॅशलाइट बूस्ट, कस्टमाइजेबल अॅक्शन बटन, डेप्थ सेशन लॉग्स आणि जीपीएस यासारखे फिचर्स दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.