Breakfast For Weight Loss Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss :वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय? मग आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करायचा असतो. त्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Breakfast For Weight Loss:

आजकाल प्रत्येकजण काही न काही समस्यांनी त्रस्त असतात. त्यात सर्वात जास्त आजारपणाचा धोका वाढताना दिसत आहे. वजन वाढणे ही सर्वात मोठी समस्या आहे. वजन वाढीवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजारपणाला सामोरे जावे लागते.

वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. काहीजण वर्कआउट करतात. तसेच काही लोक डाएट करतात. मात्र, हे सर्व करुनही अनेकदा वजन कमी होत नाही. या सगळ्यावर उपाय म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयीतील बदल. आज आम्ही तुम्हाला काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे खाऊन तुम्ही वजन कमी करु शकता.

स्मूदी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळी स्मूदी पिऊ शकता. सकाळी जास्त प्रमाणात जड नाश्ता केल्याने अनेकांना त्रास होतो. अशावेळी तुम्ही स्मूदी पिऊ शकता. त्यामुळे तुमच्या आरोग्यास पा.दा होईल. तुम्ही फळे,नट्स, भाज्या आणि दूधापासून तयार केलेली स्मूदी पिऊ शकता.

उकडलेली अंडी

अंडी ही शरीरासाठी खूप जास्त चांगली असतात. अंडी खालल्याने शरीरीला खूप जास्त पोषण मिळते. तसेच रोज सकाळी नाश्त्यात अंडी खाणे चांगले असते. यामुळे तुम्ही दिवसभर ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी सकाळी उकडलेली अंडी खा.

कॉटेज चीज

वजन कमी करण्यासाठी कॉटेज चीज फायदेशीर आहे. तुम्ही तुमच्या नाश्तायमध्ये कॉटेज चीज खाऊ शकता. चरबी कमी करण्यासाठी कॉटेज चीज चांगले आहे. तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये कॉटेज चीज खाऊ शकता.

ओट्स

ओट्स हा नाश्त्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. ओट्स हा हलका आहार आहे. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. डाएटसाठी तुम्ही ओट्स खाऊ शकता.

फ्रुट सलाड

वजन कमी करण्यासाठी आहारात फ्रुट सलाडचा समावेश करा. फ्रुट सलाड शरीरासाठी खूप चांगले आहे. सकाळी सकाळी फ्रुट्स सलाड खालल्याने दिवसभर ताजेतवाने आणि पोट भरल्यासारखे वाटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT