Women Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Women Health Tips : नव मातांच्या स्तनात आढळणारा 'रस्टी पाईप सिंड्रोम' नेमका काय? याची लक्षणे कोणती? बाळावर कसा होतो परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rusty Pipe Syndrome :

बाळंतपणानंतरही काही स्त्रियांना असामान्य आजारांना सामोरे जावे लागते. रस्टी पाईप सिंड्रोम म्हणजे गंजांच्या रंगाचे कोलोस्ट्रम, प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसात जर आईच्या स्तनातून रक्त किंवा गंजसारखा स्त्राव होत असेल तर त्याला रस्टी पाईप सिंड्रोम म्हणतात.

हा सिंड्रोम गंभीर असला तरी अशावेळी घाबरू जाऊ नका कारण ही एक निरुपद्रवी अवस्था आहे, याविषयी अनेकांना माहित नाही. स्तनपान करणारी माता नक्कीच घाबरून जाऊ शकते आणि ती कदाचित स्तनपान न करण्याचा निर्णय घेऊ शकते. ही स्थिती गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यात, विशेषत: दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत होते आणि जन्म दिल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत उद्भवू शकते. 5 ते 7 दिवसांत किंवा प्रसूतीनंतर 10 दिवसांच्या आत समस्या बरी न झाल्यास अतिरिक्त निदान मूल्यांकनाचा सल्ला दिला जातो.

पुणे खराडी येथील मदरहुड हॉस्पिटल स्तनपान तज्ज्ञ श्रीमती पारुल मुदित मिश्रा यांनी याविषयी सांगितले आहे. ते म्हणाले रस्टी पाईप सिंड्रोम एक दुर्मिळ आजार (Disease) असून प्रीटर्म दूध किंवा कोलोस्ट्रममध्ये रक्त आढळून येते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास स्तनातून रक्त किंवा गंजसारखा स्त्राव येतो. अशावेळी स्तनपान विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेणे तसेच वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

दुधात रक्त आढळून येत असल्याने एक रुग्णाच्या स्तनाची तपासणी करण्यासाठी तिने स्त्रीरोगतज्ञाकडे धाव घेतली. बाळाचे पालक (Parents) अतिशय चिंतेत होते, कारण त्यांचा पहिला प्रश्न होता हा काही कर्करोग आहे की आणखी काही आजार. बाळाला दूध न देण्याचा सल्ला देत स्त्रीरोगतज्ज्ञांनी स्तनपान विशेष तज्ज्ञांची भेट घेण्यास सांगितले. त्यातून कळाले की ते रस्टी पाईप सिंड्रोम आहे. सर्वात मोठे काम म्हणजे पालकांना हे पटवून देणे हे होते की यात काहीही चुकीचे नाही आणि अशावेळी बाळाला स्तनपान करणे सुरक्षित आहे आणि 2- ते 3 दिवसात आपोआप बरे देखील होईल. काही दिवसांनी आम्हाला फोन आला की प्रकृती ठीक झाली आहे आणि बाळाची तब्येतही बरी आहे. बाळाच्या मलमूत्राचा काही रंग सामान्य झाला होता, जो सिंड्रोमसह सामान्य झाल्याचे आढळले.

1. लक्षणे कोणती?

ही स्थिती स्तनपानाच्या काही दिवसांतच आपोआप बरी होते. रस्टी पाईप सिंड्रोम म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थितीची मुख्य लक्षणे (Symptoms) म्हणजे स्तनपानादरम्यान किंवा गर्भधारणेच्या शेवटी स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे. यामध्ये स्तनाग्रांचे नुकसान होत नाही. स्तनाग्रांना दुखापत झाल्यामुळे हा रक्तस्त्राव होत असल्याचा गैरसमज करुन घेऊ नका. जर स्तनाग्रांवर जखमा असतील तर ते बरे करण्यासाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

2. अशावेळी काय केले पाहिजे?

जोपर्यंत रक्तस्राव आढळून आला तोपर्यंत स्तनपान करु नका. अशावेळी मिल्क बँकच्या पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. स्तनपान करणा-या तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय बाळाचा स्तनपान पूर्णपणे थांबवू नका.

रस्टी पाईप सिंड्रोम हे बाळासाठी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण करत नाही, काही बाळांना दुधाच्या चवीमुळे दूध देणे टाळले जाऊ शकते, असे झाल्यास तुम्ही बाळाला दूध पाजण्यापूर्वी थोडे काढून टाकू शकता, त्यामुळे बाळाला योग्य पोषण मिळेल. या परिस्थितीत गोंधळून न जाता नेहमी आपल्या जवळील स्तनपान विशेष तज्ज्ञांची मदत घ्या. स्तनपानादरम्यान आई आणि बाळामधील नातेसंबंध आणखी घट्ट होते हे लक्षात ठेवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT