Breastfeeding Tips : नव मातांमध्ये वाढतेय रिलॅक्टेशनची प्रक्रिया, स्तनपान करताना कशी घ्याल काळजी?

Stages Of Relactation : बाळ जन्माला आल्यापासून पहिले सहा महिने बाळाने आईचे दुध प्यायला हवे असे डॉक्टरांचे मत आहे. परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार स्त्रियांमध्ये स्तनपानाच्या समस्या अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.
Breastfeeding Tips
Breastfeeding TipsSaam Tv
Published On

Relactation Process :

नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आईचे दुध हे अधिक महत्त्वाचे असते. बाळ जन्माला आल्यापासून पहिले सहा महिने बाळाने आईचे दुध प्यायला हवे असे डॉक्टरांचे मत आहे. परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार स्त्रियांमध्ये स्तनपानाच्या समस्या अधिक प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

बदलेल्या जीवनशैलीनुसार नवजात आईल काही आजार (Disease) किंवा इतर गोष्टींमुळे स्तनपान लवकर सुरु होत नाही. अशावेळी रिलॅक्टेशनची प्रक्रिया महत्त्वाची ठरते. परंतु, अनेकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही. याबाबतची माहिती दिली आहे. पुण्यातील लुल्लानगर मदरहुड हॉस्पीटलचे स्तनपान विशेष तज्ज्ञ डॉ गजाला खान यांनी. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर

1. रीलॅक्टेशन म्हणजे काय?

रीलॅक्टेशन म्हणजे आईला (Mother) दूध कमी येणे किंवा बाळाला पुरेशा प्रमाणात दूध न मिळणे. त्यामुळे आई आजारापणातून बरी होऊन पुन्हा बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात करते त्याला रीलॅक्टेशन म्हटले जाते.

Breastfeeding Tips
Heart Attack Reason : तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकचे प्रमाण, या सवयी आजपासून बदलाच

2. रीलॅक्टेशन कोण करू शकते?

बाळाला (Baby) दूध पाजताना अडचणी येतात किंवा किंवा स्तनपानासंबंधी समस्यांना तोंड द्यावे लागते, बाळाला स्तनपान न करता येणे आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ दूध पूर्णपणे बंद झाले आहे, अशा कोणत्याही मातेला पुन्हा स्तनपानास सुरुवात करता येऊ शकते. काही आरोग्याविषयक समस्यांमुळे स्तनपानात काही दिवसांचे अंतर पडले आणि त्यानंतर ती माता बाळाला पुन्हा स्तनपान सुरु करण्यास तयार असते तेव्हा त्याला रीलॅक्टेशन करण्याची योग्य वेळ असे म्हणतात

3. रीलॅक्टेशनचा योग्य मार्ग

आईला स्तनपानासंबंधी प्रशिक्षण देणे, स्तनांची मालिश करणे आणि पंपिंग करणे होय. तसेच बाळाला स्तनपानाकडे पुन्हा प्रवृत्त करणे या प्रक्रियेचा समावेश होतो. स्तनपान हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे.

Breastfeeding Tips
Breastfeeding Tips : ऑफिसला जाणाऱ्या नव मातांनी बाळांना दूध पाजण्याचे नियोजन कसे करावे? वेळ नसेल तर उपाय काय?

4. कोणते घटक प्रभावी ठरतात

तुमच्या बाळाचे वय यामध्ये महत्त्वाचे ठरते. बाळ लहान असताना रीलॅक्टेशन करणे सोपे होते. साधारणतः 4-5 महिन्यांच्या बाळांमध्ये यशाचा दर जास्त असतो. स्तनपान आणि पंपिंग करणे हे सुद्धा लॅक्टेशनसाठी मुख्य घटक ठरतात. तुमच्या बाळाची स्तनपानाची आवड देखील प्रक्रियेवर प्रभाव टाकते. कुटुंब, मित्र आणि तज्ज्ञांकडून प्रेत्साहन मिळाल्यास हा प्रवास सोपा होतो.अशाप्रकारे तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान पुन्हा सुरु करु शकता

5. स्तनपान केव्हा करावे

  • बाळ उठल्यानंतर लगेच रात्री झोपताना स्तनपान करा

  • बाटली आणि पॅसिफायरचा वापर कमी करा. बाळाला त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्तनपान करण्यास प्रोत्साहित करा.

  • स्तनपानीपूर्वी स्तनाग्रांना थोडेसे आईचे दूध लावा. या टिप्सचे पालन करुन तुम्ही नक्कीच बाळाला पुन्हा स्तनपान करू शकाल. तज्ज्ञांच्या मदतीने री लॅक्टेशन बाबतच्या तुमच्या सर्व शंकांचे निरसन करणे ही काळाची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com