Drinking Coffee Tips For Coffee Lovers- Saam Tv
लाईफस्टाईल

Tips For Coffee Lovers: कॉफी पिण्याचीही योग्य वेळ असते का? दिवसाला किती प्रमाणात प्यायला हवी? जाणून घ्या

Right Time To Drinking Coffee : क्वचितच लोकांनी कॉफी प्यायला आवडत नाही. असे बरेच लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात. अवेळी कॉफी प्यायल्याने आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Shraddha Thik

Time To Drink Coffee and its harm:

क्वचितच कोणी असेल ज्याला कॉफी प्यायला आवडत नाही. असे बरेच लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात कॉफी पिऊन करतात. खरं तर, लोकांना सकाळी उठल्यावर सुस्ती येऊ नये यासाठी ते कॉफी (Coffee) पितात. यामध्ये असलेले कॅफिन चयापचय सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे, परंतु ते पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही लोकांना सकाळी, संध्याकाळी किंवा झोपेच्या वेळी कॉफी प्यायला आवडते, परंतु अशा अवेळी कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे निद्रानाश होऊ शकते. झोपेच्या कमतरतेमुळे हृदयविकार, कर्करोग (Cancer), हार्मोनल समस्या इत्यादी अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

कॉफी पिण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे

शरीराच्या तणावाच्या प्रतिसादासाठी कोर्टिसोल आवश्यक मानले जाते. कोर्टिसोल तुमची उर्जा पातळी तसेच दिवसभरातील तणाव पातळी नियंत्रणात ठेवते. सकाळी उठल्यानंतर शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते. सकाळी कॉफी प्यायल्यास शरीरातील नैसर्गिक ऊर्जा कमी होते, त्यामुळे सकाळी कॉफी पिणे टाळा.

याशिवाय रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो . त्यामुळे छातीत जळजळ होते. सकाळी उठल्यानंतर फक्त 1-2 तासांनंतर कॉफी प्या, ही तुमच्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. याशिवाय खाण्यापूर्वी कॉफी पिणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

जास्त प्रमाणात कॉफी पिण्याचे तोटे

  • जर तुम्ही हाय बीपीचे रुग्ण असाल आणि कॉफी जास्त प्रमाणात प्यायली तर बीपीची समस्या आणखी वाढू शकते. शरीरात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही असू शकतो, त्यामुळे कॅफिन असलेल्या गोष्टी टाळा.

  • थंडीच्या मोसमात शरीर उबदार ठेवण्यासाठी अनेकजण आवश्यकतेपेक्षा जास्त कॉफी पितात. अशा स्थितीत तुमची पचनक्रिया बिघडू शकते. यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या होऊ शकते.

  • जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने हाडांवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

  • जर तुम्हाला अनेकदा झोपेच्या समस्येने त्रास होत असेल तर तुम्ही कॉफी पिऊ नये. यामध्ये असलेले कॅफिन झोपेवर परिणाम करते. अशा स्थितीत जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT