Red chili haram, Health tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health tips : सावधान ! तिखटाशिवाय पदार्थांची चव लागत नाही? सतत तिखट खायला आवडते, तर जाणून घ्या त्याचे दूष्परिणाम

सतत मसालेदार पदार्थ खायला आवडते त्यांना या गंभीर नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.

कोमल दामुद्रे

Red Chili Harm : भारतीय मसाल्यांमध्ये स्वयंपाकघरात अधिक महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय जेवणातील प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्यासाठी मसाले अधिक महत्त्वपूर्ण ठरतात.

हे देखील पहा -

भारतातील अनेक पदार्थांमध्ये लाल मिर्ची पावडरचा हमखास वापर होतो. काही मिरची पावडर या पदार्थांची चव वाढवतात तर काही पदार्थांचा रंग बदलतात. लाल मिरची आपल्या जेवणाची चव वाढवत जरी असली तरी ती आपल्या आरोग्यासाठी तितकीच हानिकारक आहे. बरेच लोक त्याचा जास्त वापर करतात. जे लोक जास्त मसालेदार खातात किंवा ज्यांना लाल तिखट जास्त आवडते, त्यांना कधीकधी खूप गंभीर नुकसान सहन करावे लागते. सतत लाल तिखट खाल्ल्याने जेवणात आपल्याला आरोग्याला हानी होते व आपल्याला अनेक आजार होतात. जाणून घेऊया त्याबद्दल.

सतत लाल मिर्ची खाल्ल्याने शरीराला होऊ शकते असे नुकसान -

१. सतत लाल मिर्ची किंवा तिखटाचे पदार्ख खाल्ल्याने आपल्याला छातीत जळजळ होऊ लागते. त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर आपल्याला जळजळ होते त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. हा त्रास अधिक जाणवू लागल्यास डॉक्टरांची भेट घ्यावी.

२. लाल मिर्ची अन्नातील (Food) पोषक तत्वे काढून टाकतात. ज्यामुळे आपल्याला पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पचनाच्या समस्येमुळे आपल्या शरीराला (Health) त्याचे नुकसान होते.

३. लाल मिर्चीचे अधिक सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढून आपल्याला तोंड येणाची किंवा तोंडात छाले येण्याची समस्या निर्माण होते. जर आपल्याला श्वसनाचे कोणतेही आजार असतील तर लाल मिरचीचे सेवन धोकादायक ठरू शकते. जास्त लाल मिरच्या खाल्ल्याने दम्याचा झटका येण्याचा धोकाही वाढतो.

४. गर्भवती महिलांनी लाल तिखट खाऊ नये. अधिक लाल तिखटाचे सेवन केल्यास बाळावर देखील त्याचा परिणाम होऊ लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT