Muscle side effects Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर स्नायूंमुळे परिणाम होतो का ? तो कसा होतो? जाणून घ्या

आरोग्‍यदायी जीवनशैली स्‍नायूंच्‍या आरोग्‍यासंदर्भातील समस्‍यांचे निराकरण कसे कराल ?

कोमल दामुद्रे

Health Tips : आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपल्याला शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासोबत ती टिकवून ठेवणे अधिक गरजेचे आहे.

सध्याच्या जीवनशैलीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे.सौम्‍य संसर्गांमधून गंभीर आजार न होण्‍याच्‍या खात्रीसाठी गंभीर आजारांनी पीडित व्‍यक्‍तींसाठी रोगप्रतिकारशक्‍ती प्रबळ असणे अधिक महत्त्वाचे आहे.

उत्तम, संतुलित पोषण प्रबळ रोगप्रतिकारशक्‍तीसाठी उत्तम स्रोत असले तरी बहुतांश व्‍यक्‍तींना माहित नाही की स्‍नायूंचे आरोग्‍य कमकुवत असल्‍यास त्‍याचा रोगप्रतिकारशक्‍तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्‍यवसायामधील मेडिकल अॅण्‍ड सायण्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख याविषयी आपल्‍याला सांगत आहेत

स्नायू, रोगप्रतिकारशक्ती व आजार यांचा संबंध -

स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम असणे महत्त्वाचे आहे, कारण ते हालचालीमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि वय वाढत असताना शक्तिशाली व कार्यरत राहण्‍यासाठी स्नायूंचे संरक्षण महत्त्वाचे आहे. स्‍नायू रोगप्रतिकारशक्‍तीमध्‍ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात याबाबत पुरावा आहे. स्‍नायू संयुगे निर्माण करण्‍यासोबत ते मुक्‍त देखील करतात.

काही रोगप्रतिकारक पेशींची निर्मिती, सक्रियकरण व वितरणामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ते तणाव किंवा संसर्गादरम्यान शरीराद्वारे वापरल्या जाणार्‍या अमिनो आम्‍लाचे मुख्य स्‍त्रोत देखील आहेत. वयाच्‍या ४० शी नंतर पुरूष व महिला या दोघांच्‍या शरीररचनेमध्‍ये बदल होऊ लागतात. अधिक महत्त्वाचे म्‍हणजे शरीरामधील स्‍नायूशक्‍ती वेगाने कमी होऊ लागते आणि वयाच्‍या ४० ते ८० वर्षादरम्‍यान ३३ टक्‍के स्‍नायूशक्‍ती कमी होऊ शकते.

कमकुवत स्‍नायूशक्‍ती आणि प्रथिनांचे अपुरे सेवन यामुळे शरीराची दुखापत किंवा संसर्गाप्रती प्रतिकार कमकुवत होऊ शकतो आणि उदयोन्मुख संशोधन निदर्शनास आणते की, स्‍नायूशक्‍ती कमकुवत असल्‍यास रोगप्रतिकारशक्‍ती कमी होऊन आजार होण्‍याची शक्‍यता वाढू शकते.

प्रत्‍येकाचे वय वाढत असताना स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला आणि स्‍नायूशक्‍ती कमी होण्‍यास प्रतिबंध करण्‍याला प्राधान्‍य दिले पाहिजे, तसेच गंभीर आजारांनी पीडित व्‍यक्‍तींनी याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. यात फुफ्फुसाचे आजार, मधुमेह (Diabetes), हृदयविषयक आजार इत्‍यादींसारखे आजार (Disease) स्‍नायू कमकुवत करण्‍यासोबत स्नायूशक्ती कमी करू शकतात.

आरोग्‍यदायी जीवनशैली स्‍नायूंच्‍या आरोग्‍यासंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्यास मदत करु शकते?

१. आठवड्यातून किमान १५० मिनिटे पुरेसा व्‍यायाम करण्‍याचे लक्ष्‍य आणि संतुलित आहाराचे सेवन हे आरोग्यदायी राहण्‍यासाठी, स्नायूंना बळकटी देण्‍यासाठी, तसेच रक्‍तातील शर्करेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये साह्य करण्यासाठी आवश्‍यक आहे.

२. शारीरिक व्‍यायामाचे फायदे अनेक आहेत. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, आपण शारीरिक व्‍यायाम केल्‍याने लठ्ठपणा कमी होण्‍यास मदत होते, आपले लिपिड प्रोफाइल, इन्‍सुलिन सेन्सिटीव्‍हीटी सुधारतात आणि रक्‍तदाब कमी होतो. चेअर चॅलेंज टेस्‍ट ही देखील स्‍नायूशक्‍ती तपासण्‍यासाठी, स्‍नायू क्षमता जाणून घेण्यासाठी आणि वेळेवर योग्‍य उपाय अवलंबण्‍यासाठी सुलभ पद्धत आहे.

३. अंदाजे ४३ सेमी (१.४ फूट) उंची असलेल्‍या खुर्चीवर ५ सिट-अप्‍स करण्‍यासाठी लागणारा कालावधी आपल्या स्‍नायूशक्‍तीबाबत माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ, ४० ते ५० वर्षे वय असलेल्‍या पुरूषांना ही चाचणी करण्‍यास जवळपास ६.८ ते ७.५ सेकंद वेळ घ्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Diet : हाडांच्या मजबुतीसाठी नाचणी ठरतेय वरदान! छोट्याशा दाण्यात कॅल्शियमचा मोठा खजिना

Maharashtra News Live Update: सरकारी इमारती आणि मंत्र्यांच्या बंगल्यांचे होणार फायर ऑडिट; वनमंत्री गणेश नाईकांची मुख्य सचिवांकडे मागणी

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळली

मेथीच्या भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

College Outfits For Winter: हिवाळ्यात कॉलेजला जाताना दिसा स्टायलिश! ट्राय करा ७ ट्रेंडी आणि कोझी विंटर आउटफिट्स

SCROLL FOR NEXT