Senior Citizen Day : डोळ्यांच्या अनेक आजरांसह जगणाऱ्या ज्येष्ठ नागिराकांसाठी मोलाचा सल्ला !

वाढत्या वयानुसार डोळ्यांची काळजी घ्या
Senior Citizen Day , Eye care Tips
Senior Citizen Day , Eye care TipsSaam Tv
Published On

Senior Citizen Day : जसं जसे वय वाढत जाते तसं तसे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. याचा सामना सध्या वयोवृध्दांना करावा लागत आहे.

वयोवृद्ध व्यक्तींमध्ये नजर अधू होण्याची समस्या सर्रास आढळून येते. जगभरात २५ कोटी लोक दृष्टीदोषाचा सामना करत असून त्यापैकी ८० टक्‍के लोक ५० वर्षांपुढील वयोगटातील आहेत.

दृष्टी गमावण्याचा वयोवृद्ध व्यक्तींच्या जीवनमानाच्या दर्जावर विपरित परिणाम होतो व त्यातून मृत्यू संभवू शकतो. नेत्रपटलांच्या आजारांविषयी अर्थात रेटिनल डिझिजेसविषयी जागरुकतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने आणि उपचारांच्या अभावामुळे नेत्रपटलाचे आजार असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना नैराश्य आणि चिंता अशा मनोविकारांचा धोका अधिक प्रमाणात असतो.

रेटिनाच्या आजारांमुळे केवळ अस्वस्थता येत नाही, तर त्यामुळे एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचे आयुष्य कायमचे आणि संपूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच नजर गमावण्याचा धोका टाळण्यासाठी रेटिनाची योग्य देखभाल करणे आणि रेटिनाचे आरोग्य जपणे या गोष्टींकडे पहिल्यांदा लक्ष दिले पाहिजे.

Senior Citizen Day , Eye care Tips
Eyes Pain : तुमचे डोळे सतत दुखतात का ? जाणून घ्या कारण

वाढत्या वयानुसार उद्भवणाच्या डोळ्यांच्या सर्वसाधारण समस्या:

Eye Care Tips
Eye Care Tips Canva

पुण्यातील इनसाइट व्हिजन फाउंडेशनचे मेडिकल डिरेक्टर डॉ. नितीन प्रभुदेसाई सांगतात, “१० ते १५ टक्‍के ज्येष्ठ नागरिकांमध्ये रेटिनाशी निगडित समस्या उद्भवतात मात्र त्यांची तीव्रता वेगवेगळी असते. यामध्ये एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन, डायबेटिक मॅक्युरल एडेमा, व्हॅस्क्युलर ऑक्लुजन्स, रेटिनल डिटॅचमेंट या समस्या सरसकट आढळून येतात. म्हणूनच आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होण्यासाठी व तो बळावू नये यासाठी वर्षातून एकदा डोळे आणि रेटिनाची तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घेणा-या व्यक्तींनीही त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. त्यांच्या दृष्टीमध्ये काही बदल आढळून आल्यास ताबडतोब नेत्रविकारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.

वाढत्या वयामध्ये नजर चांगली राखण्यासाठी काही उपाय -

वयोवृद्ध व्यक्तींच्या बाबतीत नजर कमकुवत होण्याची समस्या ही वाढत्या वयाचा अटळ भाग म्हणून दुर्लक्षित केली जाते. परंतु, वेळेवर लक्ष दिले की, या समस्येचा सामना करता येतो.

Senior Citizen Day , Eye care Tips
Eye care tips : कम्प्युटर व स्मार्टफोनच्या स्क्रीनचा डोळ्यांवर परिणाम कसा होतो? डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

डोळ्यांची तपासणी करा -

आपल्या डोळ्यांची योग्यरित्या तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्या समस्येचे निदान लवकर झाले तर डोळ्यांना संरक्षण तर मिळेलच पण दृष्टी गमावण्याचा धोका टाळण्यासही मदत होईल. खरेतर कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा न घालणा-या, नजर चांगली असलेल्या ज्येष्ठांनीही नियमितपणे नेत्रतपासणी करून घ्यायला हवी. यामुळे संसर्गास प्रतिबंध होऊ शकेल तसेच कालपरत्वे बळावत जाणा-या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होऊ शकेल.

उपचारांचे काटेकोरपणे पालन -

डोळ्यांचा कोरडेपणा तसेच अश्रू येण्यास अडथळा निर्माण होणे किंवा एएमडी आणि डीएमई सारखे कालपरत्वे बळावणारे आजार यापैकी कोणत्या समस्येवरील उपचारांची आपल्याला गरज आहे हे विशेषतज्ज्ञ ठरवतात. एएमडीच्या समस्येवर औषधांच्या (Medicine) व लेझर थेरपीच्या मदतीने प्रभावी उपचार शक्य आहेत आणि रुग्णांना दैनंदिन वापरासाठी कमी लो व्हिजन एड्स अर्थात अधू नजरेला आधार देणा-या उपकरणांचा वापरही करता येईल.

शरीराची नियमित देखभाल -

रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉल या फक्त हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित समस्या वाटतात, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यातून डोळ्यांसह इतर महत्त्वाच्या इंद्रियांची हानी होऊ शकते. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मधुमेह हा मूकपणे रेटिनाची हानी घडवून आणत असतो. असे असले तरीही आज रक्तातील ग्लुकोजची पातळी सातत्याने तपासण्यासाठी सेन्सर यंत्रणा बसविलेली कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरींग उपकरणे उपलब्ध आहेत. या उपकरणांमुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखता येऊ शकते. आपला रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल आणि ग्लुकोज निरोगी पातळीवर राखल्यास रेटिनाच्या आरोग्याचीही हमी मिळेल.

डोळ्यांची काळजी -

फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणजे प्रकाशाचा त्रास होण्याची समस्या नसली तरीही आपले डोळे (Eye) सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट (यूव्‍ही) किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊ नयेत यासाठी उघड्या डोळ्यांनी सूर्यप्रकाशाकडे पाहणे टाळायला हवे. यूव्‍ही किरणांमुळे रेटिनाची हानी होते आणि बहुतांश लोकांना खूप उशीर होईपर्यंत ही गोष्ट लक्षात येत नाही. तेव्हा घराबाहेर यूव्‍ही प्रतिबंधक कोटिंग असलेले सनग्लासेस वापरा किंवा तुम्ही आधीच रेटिना किंवा डोळ्यांवरील उपचार घेत असाल तर तुमच्या विशेषतज्ज्ञांनी सांगितलेला चष्मा वापरा.

आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा स्वीकार -

आपल्याला रेटिनाशी निगडित काही विशिष्ट आजारांची लागण आधीच झाली असेल तर धूम्रपान आवर्जून टाळायला हवे. धूम्रपानामुळे नेत्रविकार जडतात तसेच अधिक वेगाने दृष्टीहीनता येते.

आपल्या रेटिनाचे आरोग्य जपण्यामध्ये आपल्या आहाराची महत्त्वाची भूमिका असते. अँटिऑक्सिडंट्स आणि अत्यावश्यक खनिजे असणा-या अन्नपदार्थांचा आहरात समावेश करा, जे रेटिनाला हानी पोहोचवणा-या फ्री रॅडिकल्सशी लढा देऊ शकतील. फळे आणि पालेभाज्या अंडी, रेड मीट आणि कवच असलेले मासे खा. अक्रोड, मासे आणि अळशीच्या बियाचे सेवन करा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com