Manasvi Choudhary
मेथीची भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक मानली जाते. परंतु चवीला कडू असणारी ही भाजी अनेकजण खायला नाक मुरडतात.
जर तुम्हालाही मेथीचा कडूपणा आवडत नसेल, तर काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही मेथीची भाजी चवदार बनवू शकतात. मेथीच्या भाजीचा कडूपणा घालवण्याचे ५ सोपे उपाय कोणते?
मेथीची भाजी निवडताना कोवळी, ताजी आणि हिरवीगार पाने निवडावीत. जुन्या किंवा जाड देठांच्या मेथीमध्ये कडूपणा जास्त असतो.
मेथी निवडल्यानंतर ती स्वच्छ पाण्यात २ ते ३ वेळा धुवून घ्या. भाजी धुतल्यामुळे कडवटपणा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
मेथीची भाजी चिरल्यानंतर १० ते १५ मिनिटे मीठ लावून बाजूला ठेवा. त्यानंतर मेथीला सुटलेले कडू पाणी हाताने पिळून काढून टाका. यामुळे भाजीचा कडूपणा निघून जातो.
मेथीची भाजी बनवताना फोडणीमध्ये बारीक चिरलेला भरपूर लसूण, कांदा आणि हिरवी मिरची घाला. यामुळे भाजी चवदार बनते याशिवाय तिच्यातील कडवटपणा कमी होतो.
मेथीची भाजीमध्ये बटाटा, भिजवलेली चणाडाळ किंवा मूगडाळ मिक्स करा. डाळ किंवा बटाट्यामुळे भाजीला चव येते याशिवाय कडूपणा कमी होतो.