Shruti Vilas Kadam
हिवाळ्यात कॉलेजसाठी ओव्हरसाइज्ड स्वेटर हा उत्तम पर्याय आहे. ब्लू किंवा ब्लॅक जीन्ससोबत पेस्टल रंगाचा स्वेटर घाला. स्नीकर्स आणि स्लिंग बॅगमुळे तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल.
कॉलेजमध्ये कॅज्युअल आणि कूल दिसायचे असेल तर हुडी आणि वाइड लेग जीन्सची जोडी ट्राय करा. यासोबत व्हाइट स्नीकर्स आणि कॅप घातल्यास तुमचा लुक एकदम ट्रेंडी दिसेल.
टर्टलनेक स्वेटरमुळे तुम्हाला क्लासी आणि एलिगंट लुक मिळेल. यासोबत वाइड लेग ट्राउझर्स किंवा फॉर्मल पँट घाला. कॉलेज प्रेझेंटेशन किंवा खास दिवशी हा लुक छान दिसेल.
डेनिम जॅकेट हा नेहमीच ट्रेंडमध्ये असणारा पर्याय आहे. साध्या टॉप किंवा टी-शर्टवर डेनिम जॅकेट घाला. यासोबत जीन्स आणि स्नीकर्स परिधान केल्यास स्टायलिश लुक मिळेल.
फेमिनिन आणि क्यूट लुक आवडत असेल तर कार्डिगनसोबत स्कर्ट घाला. थंडीपासून बचाव करण्यासाठी यासोबत टाइट्स आणि बूट्स वापरा. हा आउटफिट कॉलेजसाठी खूप सुंदर दिसतो.
कॉलेजमध्ये दिवसभर आरामदायी राहायचे असेल तर स्वेटशर्ट आणि जॉगर्स हा उत्तम पर्याय आहे. यासोबत स्पोर्ट्स शूज आणि बॅकपॅक कॅरी करा. हा लुक साधा, आरामदायी आणि स्टायलिश दिसतो.
हिवाळ्यात क्लासी लुक हवा असेल तर लॉन्ग कोट आणि जीन्सची जोडी ट्राय करा. आतमध्ये टर्टलनेक किंवा साधा टॉप घाला. यासोबत बूट्स आणि स्कार्फ वापरल्यास तुमचा विंटर लुक परिपूर्ण होईल.