Matka Kulfi Recipe: उन्हात थंडगार मटका कुल्फी खाण्याची मजाच वेगळी! मलाईदार कुल्फी घरीच बनवा वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

मटका कुल्फीसाठी साहित्य

मटका कुल्फी बनवण्यासाठी १ लिटर दूध, अर्धी वाटी साखर, २ चमचे मिल्क पावडर, अर्धा चमचा वेलची पूड, बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप घ्या.

Matka Kulfi Recipe | Saam TV

दूध चांगले उकळून घ्या

सर्वप्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घ्या. ते मध्यम आचेवर उकळायला ठेवा. दूध सतत ढवळत राहा. यामुळे दूध भांड्याला चिकटणार नाही.

Matka Kulfi | yandex

दूध घट्ट करून घ्या

दूध उकळल्यानंतर गॅस मंद करा. दूध थोडे आटवून घट्ट होऊ द्या. यामुळे कुल्फीला बाजारासारखा घट्ट आणि मलाईदार स्वाद मिळेल.

साखर आणि ड्रायफ्रूट्स घाला

आता दुधात साखर आणि मिल्क पावडर घाला. त्यानंतर वेलची पूड, बदाम, काजू आणि पिस्त्याचे काप टाका. सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.

Matka Kulfi Recipe

मिश्रण थंड करून घ्या

तयार झालेले दूध गॅसवरून खाली उतरवा. ते पूर्णपणे थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात साय किंवा मलई घातल्यास कुल्फी आणखी मलाईदार होईल.

Matka Kulfi Recipe | Saam TV

मटक्यांमध्ये मिश्रण भरा

आता तयार मिश्रण छोट्या मटक्यांमध्ये भरा. मटक्यांवर झाकण किंवा अॅल्युमिनियम फॉइल लावा. यामुळे फ्रीजरमधील इतर पदार्थांचा वास कुल्फीला लागणार नाही.

Matka Kulfi Recipe

फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा

मटक्यांमधील मिश्रण ६ ते ८ तास किंवा पूर्णपणे घट्ट होईपर्यंत फ्रीजरमध्ये ठेवा. कुल्फी सेट झाल्यानंतर त्यावर बदाम आणि पिस्त्याचे काप घालून थंडगार सर्व्ह करा.

Kulfi | Saam TV

Diwali Fatigue: दिवाळीच्या धावपळीमुळे जाणवतोय थकवा आणि आळस? मग घरीच करा हे ७ सोपे उपाय!

Diwali Fatigue | Saam Tv
येथे क्लिक करा