Diwali Fatigue: दिवाळीच्या धावपळीमुळे जाणवतोय थकवा आणि आळस? मग घरीच करा हे ७ सोपे उपाय!

Shruti Vilas Kadam

दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा

दिवाळीत गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे शरीराला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासणार नाही.

Feeling tired all the time | pinterest

हलका आणि पौष्टिक आहार घ्या

दिवाळीत फराळ, मिठाई आणि तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात. त्यामुळे काही दिवस हलका आणि घरगुती आहार घ्या. जेवणात हिरव्या भाज्या, फळे, डाळी आणि सॅलडचा समावेश करा.

waking up tired

रोज थोडा वेळ चालायला जा

सतत घरात बसून राहिल्यामुळे शरीर आणखी आळशी होऊ शकते. त्यामुळे रोज सकाळी किंवा संध्याकाळी २० ते ३० मिनिटे चालायला जा. यामुळे शरीर सक्रिय राहण्यास आणि मूड सुधारण्यास मदत होऊ शकते.

feeling tired

पुरेशी झोप घ्या

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे यामुळे झोपेचे वेळापत्रक बिघडते. त्यामुळे रोज ठरलेल्या वेळी झोपा आणि किमान ७ ते ९ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा.

sleep | pinterest

आवडते गाणे ऐका

मन उदास असेल किंवा काहीच करावेसे वाटत नसेल तर आवडती गाणी ऐका. गाण्यामुळे मन प्रसन्न होण्यास आणि ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

feeling tired

मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहा

सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांना आणि मनाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे काही वेळ मोबाईल बाजूला ठेवा. त्याऐवजी पुस्तक वाचा, कुटुंबासोबत वेळ घालवा किंवा आवडता छंद जोपासा.

feeling tired | Google

स्वतःसाठी थोडा वेळ काढा

दिवसभराच्या कामातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. योगासने करा, ध्यानधारणा करा किंवा आवडते काम करा. यामुळे मन शांत राहण्यास आणि सकारात्मक वाटण्यास मदत होऊ शकते.

Feeling Fatigued | pinterest

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.

feeling tired | Google

Lemon Water Effects: लिंबू पाणी पिण्याचे अनेक फायदे; पण 'या' ७ लोकांनी चुकूनही पिऊ नका, होऊ शकते नुकसान!

Lemon Water Effects | Saam Tv
येथे क्लिक करा