Shruti Vilas Kadam
ज्यांना वारंवार अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होते, त्यांनी लिंबू पाणी कमी प्यावे. कारण लिंबू आंबट असल्यामुळे काही लोकांना जळजळ वाढू शकते.
ज्यांच्या पोटात अल्सर आहे, त्यांनी लिंबू पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लिंबू पाण्यामुळे काही लोकांना पोटात जळजळ होऊ शकते.
थंड किंवा गरम पदार्थ खाल्ल्यावर ज्यांचे दात दुखतात, त्यांनी लिंबू पाणी जास्त पिऊ नये. कारण लिंबातील आंबटपणामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ शकतो.
काही लोकांना आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. लिंबू पाणी प्यायल्यानंतर डोकेदुखी वाढत असेल तर ते पिणे टाळावे.
ज्यांना किडनीचा आजार आहे, त्यांनी लिंबू पाणी नियमित पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण अशा लोकांना खाण्यापिण्याबाबत काही नियम पाळावे लागतात.
काही लोकांना लिंबाची अॅलर्जी असते. लिंबू पाणी प्यायल्यानंतर अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे किंवा सूज येणे असा त्रास होत असेल तर ते पिणे टाळावे.
ज्यांना घशात जळजळ किंवा आंबट ढेकर येण्याचा त्रास होतो, त्यांनी लिंबू पाणी जपून प्यावे. लिंबू पाणी प्यायल्यानंतर त्रास वाढत असेल तर ते पिणे टाळावे.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.