Shruti Vilas Kadam
पूर्वी स्ट्रोकचा त्रास प्रामुख्याने वृद्धांना होत असे. पण आता तरुणांमध्येही स्ट्रोकची प्रकरणे वाढत आहेत. ५५ वर्षांखालील व्यक्तींनाही स्ट्रोकचा धोका असू शकतो.
उच्च रक्तदाब हे स्ट्रोक होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि हृदयाचे आजार यांमुळेही स्ट्रोक होऊ शकतो.
वेळेवर जेवण न करणे, व्यायामाचा अभाव, सतत बसून राहणे, धूम्रपान, मद्यपान आणि जास्त ताण घेणे अशा सवयींमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
सतत डोकेदुखी होणे, मान दुखणे, चक्कर येणे, चालताना तोल जाणे किंवा अचानक दिसण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
स्ट्रोक आल्यास चेहरा एका बाजूला वाकडा होऊ शकतो. हात किंवा पाय अचानक कमजोर होऊ शकतात. बोलताना अडचण येणे, अचानक दिसणे कमी होणे आणि शरीराचा तोल जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता रुग्णालयात जा. काही प्रकारच्या स्ट्रोकमध्ये सुरुवातीच्या साडेचार तासांत उपचार मिळाल्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपाय करण्यात वेळ घालवू नका.
स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी रोज व्यायाम करा. सकस आणि संतुलित आहार घ्या. मिठाचे प्रमाण कमी ठेवा. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियमित तपासा. धूम्रपान टाळा आणि पुरेशी झोप घ्या.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.