Matar Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखी चविष्ट मटर पनीर, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

आवश्यक साहित्य तयार करा

मटर पनीर बनवण्यासाठी २०० ग्रॅम पनीर, १ कप हिरवे मटार, २ टोमॅटो, २ कांदे, १ चमचा आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, धणेपूड, गरम मसाला, जिरे, मीठ आणि तेल घ्या.

Matar Paneer Recipe | SAAM TV

कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवा

सर्वप्रथम कढईत थोडे तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

Matar Paneer

मसाला चांगला परतून घ्या

आता कढईत तेल गरम करून जिरे घाला. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यात कांदा-टोमॅटोची पेस्ट घाला. हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत शिजवा.

Matar Paneer | yandex

मटार शिजवून घ्या

तयार मसाल्यामध्ये हिरवे मटार घाला. त्यानंतर थोडे पाणी घालून कढईवर झाकण ठेवा. मटार मऊ होईपर्यंत शिजवा. मटार जास्त शिजून त्याचा आकार खराब होणार नाही, याची काळजी घ्या.

Matar Paneer

पनीरचे तुकडे घाला

आता पनीरचे चौकोनी तुकडे करून ग्रेव्हीमध्ये घाला. पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने भाजी मिक्स करा. पनीरचे तुकडे तुटणार नाहीत याची काळजी घ्या.

Matar Paneer

भाजीला द्या रेस्टॉरंटसारखी चव

भाजीमध्ये गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथी हाताने चुरडून घाला. अधिक चवदार ग्रेव्हीसाठी थोडी फ्रेश क्रीम घालू शकता. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून ३ ते ४ मिनिटे शिजवा.

Matar Paneer

गरमागरम मटर पनीर सर्व्ह करा

तयार झालेल्या मटर पनीर भाजीवर कोथिंबीर आणि थोडी क्रीम घालून सजवा. गरमागरम मटर पनीर चपाती, नान, पराठा किंवा जीरा राईससोबत सर्व्ह करा. तुमची चविष्ट रेस्टॉरंट स्टाइल मटर पनीर भाजी तयार आहे.

Matar Paneer

Skin Care: मुलायम आणि मऊ त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा 'हा' फेसपॅक; १० मिनिटांत मिळेल इंस्टेंट ग्लो

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा