Health Tips  saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : कितीही पाणी प्यायले तरी सतत तहान लागते? असू शकतो गंभीर आजार

Dehydration Problem : सतत तहान लागणे आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे. जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर कोणते आजार जडू शकतात हे पाहूया

कोमल दामुद्रे

Causes Of Excessive Thirst :

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी नियमित पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेत सतत तहान लागत असेल तर आपण समजू शकतो. परंतु, हिवाळ्यात डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

हिवाळ्यात आपण कमी प्रमाणात पाणी पितो. परंतु, हिवाळ्यातही तुम्हाला पाणी पिऊन देखील सतत तहान लागत असेल तर अनेक आजारांना बळी पडू शकता. पाणी प्यायल्याने अन्नपचनास मदत होते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते. परंतु, सतत तहान लागणे आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे. जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर कोणते आजार जडू शकतात हे पाहूया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मधुमेह

वारंवार तहान लागणे हे शरीरातील रक्तातील साखर वाढल्याचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरातील साखरेचे (Sugar) प्रमाण वाढते तेव्हा लघवीद्वारे बाहेर टाकण्यात मदत करते. त्यामुळे शरीरात पाण्याची (Water) कमतरता भासते आणि त्यामुळे जास्त तहान लागते.

2. अशक्तपणा

शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. ही समस्या महिलांमध्ये (Women) अधिक प्रमाणात दिसून येते. याचे मुख्य कारण आहे चुकीचे खाणपाण. यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात तहान लागते. यामध्ये चक्कर येणे, थकवा येणे, घाम येणे आणि यांसारखी इतर लक्षणे दिसू लागतात.

3. वारंवार तोंड कोरडे पडणे

तोंड कोरडे राहिल्याने सतत तहान लागण्याची समस्या निर्माण होते. अति धुम्रपान, जास्त प्रमाणात औषधे घेणे यामुळे अनेक समस्या उद्भवतात. ज्यामुळे तोंड वारंवार कोरडे पडते. यामुळे श्वासाची दुर्गंधी, चव बदलणे, हिरड्यांची जळजळ आणि अन्न चघळण्याचा त्रास होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT