Diabetes: वाढत्या वयात टाईप 1 की 2, मधुमेहाचा कोणता प्रकार अधिक धोकादायक? जाणून घ्या

Diabetes News: सर्व वयोगटातील लोकांना डायबिटीज आजार होतो.
Diabetes
DiabetesSaam Tv
Published On

Diabetes Type 1 And Type 2:

जगात डायबिटीजच्या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. डायबिटीजमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सर्वच वयोगटातील लोकांना डायबिटीज आजार होतो. डायबिटीजमध्ये चार प्रकार असतात. यात प्री डायबिटीज ,टाईप1, टाईप 2, गर्भाअवस्थेत होणारा डायबिटीज.

डायबिटीजमध्ये टाईप 1 आणि टाईप 2 चे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे या रुग्णांनी काळजी घ्यायला हवी. आज आम्ही तुम्हाला डायबिटीजचे धोके सांगणार आहोत.

डायबिटीज टाईप 1

टाईप 1 डायबिटीज ही पहिली स्टेज आहे. जर पालकांपैकी कोणालीही मधुमेह असेल तर हा धोका वाढू शकतो. त्यानंतर टाईप 2 विकसित होतो. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे डायबिटीज होतो. मधुमेहाचा धोका कोणत्याही वयात होऊ शकतो.

टाईप 1 आणि टाईप 2

टाईप 1 डायबिटीज हा टाइप 2 डायबिटीजपेक्षा कमी धोकादायक आहे. टाईप 1 डायबिटीज हा पूर्णपणे अनुवंशिक असतो. हा आजार लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये पसरु शकतो. लठ्ठपणा, कमी शारीरीक हालचाल तसेच खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे टाईप 2 डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

Diabetes
Vastu Tips : तुळशीसोबत घरात ठेवा हे लकी प्लांट, पैशांची चणचण कधीच भासणार नाही

दोन्ही प्रकारांमध्ये फरक

टाईप 1 आणि टाईप 2 या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. डायबिटीज झाल्यावर वारंवार लघवी होणे, अंधुक दिसणे अशा समस्या निर्माण होतात.

कोणता मधुमेह अधिक धोकादायक

टाईप 1 आणि टाईप 2 या दोन्ही डायबिटीजच्या प्रकारात हृदयविकार, डोळ्यांचा आजार, रक्तवाहिन्या कमजोर होणे अशा समस्या होऊ शकतात. टाईप 1 डायबिटीजच्या रुग्णांना नेहमी इन्सुलिन शॉट्सची गरज भासू शकते. तर जीवनशैली आणि आहारात चांगल बदल करुन टाईप 2 डायबिटीज कमी केला जाऊ शकतो.

Diabetes
Dev Uthani Ekadashi 2023 : देवउठणी एकादशी कधी? महत्त्व आणि वेळ काय? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com