Vastu Tips : तुळशीसोबत घरात ठेवा हे लकी प्लांट, पैशांची चणचण कधीच भासणार नाही

Money Issue : घरात या झाडांना ठेवल्याने पैशांची कमतरता जाणवत नाही.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

Vastu Plants For Home :

वास्तूशास्त्रास अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपले नशिब चमकण्यास मदत होते. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अधिक महत्त्व असते. बरेचजण घरात कोणतीही नवीन वस्तू आणताना वास्तूशास्त्राचा उपयोग करतात.

तुळशीचे रोप हिंदू धर्मात देवीचे रुप मानले जाते. यासोबतच वास्तूशास्त्रात अनेक झाडांना घरासाठी शुभ मानले जाते. तुळशीसोबत घरात या झाडांना ठेवल्याने पैशांची कमतरता जाणवत नाही. तसेच घरात सुख-समृद्धी देखील नांदते असे म्हटले जाते. जाणून घेऊया त्याबद्दल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. तुळशीचे रोपटे

तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते. त्या घरात (Home) नेहमी सुख-समृद्धी राहाते. तसेच आर्थिक (Money) संकटे आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर राहाते.

Vastu Tips
Vastu Tips : फक्त त्वचेसाठीच नाही तर आयुष्यातील गरीबी दूर करेल कोरफड, जाणून घ्या कसे?

2. केळीचे झाड

ज्योतिष्यशास्त्रानुसार घराच्या अंगणात केळीचे झाड लावल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते. धार्मिक मान्यतेनुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असल्याचे मानले जाते. घराच्या उजव्या बाजूला केळीची लागवड केल्याने पैशांची चणचण भासत नाही.

3. शमी वनस्पती

घरामध्ये तुळशीच्या रोपासोबत शमीचे रोप लावल्याने शुभ मानले जाते. शमीच्या रोपाचा थेट संबंध शनिदेवाशी मानला जातो. म्हणूनच शनिवारी शमीच्या रोपाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार शमीच्या रोपाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

Vastu Tips
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2023 : या आठवड्यात पैशांची चणचण भासेल, सासू-सुनेचं होणार कडाक्याचे भांडण

4. मनी प्लांट

घरामध्ये मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते. ही वनस्पती पैशांसंबंधित समस्या दूर करते. असे म्हटले जाते की, ही वनस्पती (Plant) जसजशी वाढत जाते तसतशी संपत्ती देखील अधिक होते. या वनस्पतीला भौतिक सुखांचा स्वामी शुक्राशी संबंधित मानले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com