Benefits of Paa Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits of Paan : जेवणानंतर तुम्हीही पान खाता का? वाचा आरोग्याला मिळणारे जबरदस्त फायदे

Eat Betel Leaves : जेवणानंतर पान खाणे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. त्यामुळे अन्न पचन होण्यासह आणखी कोणते फायदे मिळतात याची माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

आरोग्य सुदृढ आणि निरोगी रहावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यासाठी प्रत्येक जण आहारात विविध पदार्थांचा समावेश करतात. तसेच व्यायाम आणि मेडिटेशन देखील करतात. जेवण झाल्यावर काही व्यक्तींना पान किंवा बडिशेप खाण्याची सवय असते. त्यामुळे आज पान खाण्याचे आरोग्यास होणारे फायदे जाणून घेऊ.

अॅसिडिटी आणि गॅसवर आराम

काही व्यक्तींना अपचन झाल्यावर पोटात गॅस होणे, पोट दुखणे आणि अॅसिडिटीसह डोकेदुखीचा त्रास वाढतो. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर त्यावर उपाय म्हणून गोड पान जेवणानंतर चावून चावून खावे. त्याने अॅसिडिटी आणि गॅसवर नियंत्रण मिळवता येतं.

हिरड्या मजबूत होतात

काही व्यक्तींना दातांच्या बऱ्याच समस्या असतात. सतत दातांना किड लागणे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि त्यातून रक्त बाहेर येणे अशा समस्या अनेक व्यक्तींना जाणवतात. या सर्व समस्यांवर विड्याचं पान रामबाण आहे. पानात असलेला रस आणि त्यातील जीवनसत्व इतके फायदेशीर असतात की त्याने आपल्या हिरड्या आणखी जास्त मजबूत होतात.

सर्दी खोकल्यावर आराम

सर्दी खोकला पाण्याने किंवा थंड वातावरण असल्याने होतो. मात्र काही व्यक्तींना विविध गोष्टींची अॅलर्जी सद्धा असते. त्यामुळे सुद्धा त्यांना सर्दी किंवा खोकला होतो. त्यामुळे सर्दी खोकल्यावर आराम मिळावा म्हणून तुम्ही विड्याची पाने खाऊ शकता. किंवा ही पाने पाण्यात उकळवून याचा रस सुद्धा पिऊ शकता. विड्याचे पान किमान आठ दिवस खाल्ल्यानंतर तुम्हाला आरोग्यात झालेला बदल लगेचच दिसेल.

पांढरे शुभ्र दात

दातांच्या विविध समस्यांमध्ये दात सतत पिवळे पडणे ही एक गंभिर समस्या आहे. आपले दात पांढरे शुभ्र असल्यास आपली स्माईल फार सुंदर दिसते. मात्र दातांवर पिवळा थर जमा झाल्यावर डेंटीस्टकडे जावं लागतं. कितीही ब्रश केलं तरी काही व्यक्तींच्या दातांवर साठलेला पिवळा थर दूर होत नाही. त्यामुळे देखील तुम्ही पान खाऊ शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT