Health Tips : 'कोणत्या' व्यक्तींनी बीटाचं सेवन करू नये, पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीटरूट

बीटरूटमध्ये अनेक पोषक घटक असून याच्या सेवनाने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. परंतु काही लोकांनी त्याचे सेवन टाळावे.

काही लोकांनी बीटाचं सेवन टाळावं

बीटरूटमध्ये अनेक पोषक घटक असतात. परंतु काही लोकांनी बीटरूट किंवा बीटरूट ज्यूसचे सेवन टाळावे.

किडनी समस्या

बीटरूटमध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात असून अशा परिस्थितीत त्याचं अतिसेवन टाळावं. त्यामुळे लोकांना किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

ऍलर्जी

काही लोकांना बीटरूटची ऍलर्जी असते. अशा परिस्थितीत, पुरळ आणि खाज सुटू शकतात.

गर्भवती महिला

बीटरूटमध्ये Betaine असून ते गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरतं. याचं सेवन केल्याने गर्भवती महिलांना नुकसान होऊ शकते.

पचनाच्या समस्या

बीटरूटमध्ये फायबरचे प्रमाण चांगलं असतं. जास्त प्रमाणात सेवन केल्याने काही वेळा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

कमी रक्तदाबाची समस्या

पोटॅशियम आणि सोडियमसारखे पोषक तत्व बीटरूटमध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. याचं सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

येथे वाचा- Symptoms of Diabetes: शरीरात 'हे' बदल दिसून आले तर सावधान; मधुमेहाची लक्षणं असू शकतात!