Symptoms of Diabetes: शरीरात 'हे' बदल दिसून आले तर सावधान; मधुमेहाची लक्षणं असू शकतात!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मधुमेहाचं प्रमाण

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोक मधुमेहासारखे आजाराचं प्रमाण वाढू लागलंय. मधुमेहासारखे आजार टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहाराकडे वर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

जीवनशैलीत बदल

शरीरात मधुमेहाचं प्रमाण वाढल्यास जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. तसंच रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे गोड पदार्थांचं जास्त सेवन करू नये.

वारंवार लघवी होणं

शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की, वारंवार लघवीला सुरुवात होते. इन्सुलिनचं प्रमाण जास्त असल्याने तहान जास्त लागू शकते.

त्वचेमध्ये बदल

शरीरात मधुमेहाची सुरुवात झाल्यावर तुमच्या हाताची, मान आणि कंबरेच्या त्वचेमध्ये बदल झाल्याचं दिसून येतं. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढल्यावर ही समस्या उद्भवते.

बेली फॅट

पोटाची चरबी झपाट्याने वाढणं हे देखील मधुमेहाचे प्राथमिक लक्षण आहे.

सतत इन्फेक्शन

मधुमेहाच्या सुरुवातीला सतत संसर्ग होऊ लागतो.

जखम उशीराने बरी होणं

जखमा हळूहळू भरणं हे देखील मधुमेहाचं लक्षण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे वाचा- <strong>Blood Sugar : 'हे' पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता, लक्ष द्या<br></strong>