Health Tips: तुम्ही खरंच निरोगी आहात का? 'या' ४ लक्षणांनी जाणून घ्या तुमच्या आरोग्यासाठी स्थिती!

Health Tips: आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की, आपण निरोगी रहावं. मात्र तुम्ही निरोगी आहात हे तुम्हाला कसं समजेल? जाणून घेऊया.
healthy 4 symptoms
healthy 4 symptomssaam tv
Published On

फीट आणि फाईन कोणाला रहायचं नसतं? आजारपण दूर रहावं आणि आपण निरोगी असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आपण फीट आहोत की नाही, हे तुम्ही कसं ओळखाल? केवळ शरीराबाहेर दिसणाऱ्या लक्षणांवरून ठरवू नका की तुम्ही फीट आहात की, नाही. उलट शरीर आणि मनाची स्थिती समजून तुम्ही फीट आहात की नाही हे ठरवता येऊ शकतं.

अनेकदा आपल्याला सतत थकवा जाणवतो, झोप येते अशावेळी नेमकं काय करावं हे तुम्हाला कळतं नाही. मुळात निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला कळतं नसेल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला ५ अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही निरोगी आहात की नाही, हे तुम्हाला समजू शकणार आहे.

थकवा

प्रत्येक व्यक्तींमध्ये एक ऊर्जा असते. या उर्जेमुळे तुम्हाला दिवसभर ताजतवानं वाटू लागतं. मात्र जर तुम्ही थोडं काम करून थकत असाल तर तुम्ही निरोगी नाहीत, हे समजून घेतलं पाहिजे. यामागे कदाचित चुकीचा आहार, अपूर्ण झोप कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर हे अनफीट असल्याचं लक्षण असू शकतं.

healthy 4 symptoms
Cholesterol: नसांमध्ये जमलेलं वाईट कोलेस्ट्रॉल दूर करेल केवळ हा एक ज्यूस, बनवण्याची पद्धतही एकदम सोपी!

त्वचा आणि केस

जर तुमची त्वचा कोमल आणि चमकदार केस असतील तर याचा अर्थ तुमच्या शरीरात पुरेशा प्रमाणात पोषक घटक आणि पाण्याचं प्रमाण आहे. दाट केस असण्याचा अर्थ तुमच्या शरीरात व्हिटॅमीन आणि मिनरल्सची कमतरता नसते, असा होता. मात्र जर तुमची त्वचा आणि केस रूक्ष असतील तर तुम्हाला काही समस्या असण्याची शक्यता असते.

झोपेची गुणवत्ता

एका निरोगी व्यक्तीला ६-८ तासांच्या झोपेची आवश्यकता असते. इतक्या तासांच्या झोपेनंतर सकाळी व्यक्ती फ्रेश राहतो. मात्र ६-८ तासांची झोप घेऊन देखील सकाळी तुम्हाला अस्वस्थ किंवा कंटाळा वाटत असेल तर हे चिंतेचं कारण असू शकतं.

पचन संस्था

एका निरोगी व्यक्तीची भूक सामान्य असते, त्यामुळे त्या व्यक्तीचं पचन तंत्रही योग्य पद्धतीने काम करतं. त्यामुळे जर तुम्हाला नियमित पद्धतीने भूक लागत असेल आणि तुम्ही खात असलेलं जेवण तुम्हाला पचत असेल तर तुमचं शरीर निरोगी आहे. मात्र जर तुम्हाला सतत गॅस होणं, बद्धकोष्ठता अशा समस्या जाणवत असतील तर तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

(टीप : बातमीमध्ये दिलेला सल्ला ही सामान्य आणि उपलब्ध माहिती आहे. हे तज्ज्ञांचं मत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)

healthy 4 symptoms
Water For Weight Loss: डाएट-जीम सोडा...! आता केवळ पाणी पिऊन करा तुमचं वजन कमी, कसं पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com