World Heart Day Saam Tv
लाईफस्टाईल

World Heart Day : रात्री झोपेत हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या कारणे आणि काळजी कशी घ्याल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heartattack Prevention :

सध्याचे धावपळीचे जीवन आणि कामाचे प्रेशरमुळे अनेक आजार उद्भवतात. त्यातील सर्वात मोठा आजार म्हणजे हृदयविकार. हृदयाचे आजार आपल्याला कधीही होऊ शकतो. या आजारात आपल्याला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे आधीपासूनच या आजारावर नियंत्रण ठेवावे लागते.

सध्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. कधी कोणाला काय होईल हे सांगता येणार नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीराचा आणि मनावरील ताण. हृदयविकाराचा झटका हा कधीही येऊ शकतो. अगदी झोपेतही येऊ शकतो. झोपेत हार्ट अॅटॅक येण्याची कारणे आणि त्याची काळजी कशी घ्यावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आज २९ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयविकाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

झोपेत असताना हृदयविकाराचा झटका

एका रिपोर्टनुसार, हृदयविकाराचा झटका येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हृदयाच्या नसांमधील ब्लॉकेज किंवा रक्तप्रवाहातील अडथळे. या ब्लॉकेजमध्ये दोन महत्त्वाचे घटक असतात. कोलेस्टेरॉल आणि रक्त गोठणे हे हृदयविकाराच्या आजाराचे मुख्य कारण आहे. रक्तातील अस्थिरतेमुळे कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

तरुणांमध्ये हृदयविकाराचे वाढते प्रमाण

हृदयविकारचे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात. सध्या तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नाचताना, खेळताना, जिममध्ये अनेक ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची संख्या वाढत आहे. तरुणांवरचा वाढता ताण हे त्यामागचे मोठे कारण आहे. बदलते राहणीमान आणि मनावरील ताण यामुळे हृदयविकाराचे आजार वाढतात.

हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख कारणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. झोपेत रक्त गोठल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तर काम करताना अधिक ताण आल्यावरही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

  • रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉल वाढणे

  • साखरेची उच्च पातळी (High Sugar Level)

  • शारीरिक हालचाली न करणे

  • जास्त वजन

  • मनावर आणि शरीरावर ताण येणे

हृदयाच्या आजाराची काळजी कशी घ्याल

हृदयविकाराच्या आजारासाठी खूप पूर्वीपासूनच काळजी घ्यायची असते.

  • वजन कंट्रोलमध्ये ठेवा

  • 7-8 तास झोप घेणे

  • नियमितपणे आरोग्य चेकअप करा

  • तळलेले किंवा गोड पदार्थ खाणे टाळा

  • धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा

  • नियमितपणे व्यायम करा

  • बीपी, शुगर आणि कोलेस्ट्रोल नेहमी तपासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT